पतंजलीच्या जाहिरातीतील दावे खोटे, सर्वोच्च न्यायालयाने आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना बजावले समन्स

| Published : Mar 19 2024, 04:18 PM IST

Supreme Court summons Ramdev for misleading advertisement of Patanjali bsm
पतंजलीच्या जाहिरातीतील दावे खोटे, सर्वोच्च न्यायालयाने आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना बजावले समन्स
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पतंजली उद्योगसमूहाच्या पुढच्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीत. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना जाहिरातीद्वारे खोटे आणि दिशाभूल करणारे दावे केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे.

पतंजली उद्योगसमूहाच्या पुढच्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीत. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना जाहिरातीद्वारे खोटे आणि दिशाभूल करणारे दावे केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यांना दोन आठवड्यात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पतंजली जाहिरातीच्या माध्यमातून जे दावे करते ते खोटे असल्याचा दावा अनेक ग्राहकांनी यापूर्वी केला आहे. 

जाहिरातींवर बंदी असताना निदर्शने - 
27 फेब्रुवारी रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीच्या जाहिरातींवर बंदी घातली होती. या जाहिरातींमध्ये कंपनीच्या वतीने खोटे दावे सांगितले जात होते, असे असतानाही पतंजलीने त्या जाहिराती दाखविल्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदवर कठोर कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी कंपनीचे संस्थापक बाबा रामदेव आणि एमडी बाळकृष्ण आचार्य यांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत हजर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरातींमध्ये केले जातात मोठे दावे - 
पतंजलीच्या अनेक जाहिरातींमध्ये आजाराला पूर्ण बरे करण्याचे दावे केले जातात, पण प्रत्यक्षात असं होत नसल्याचं दिसून आले आहे. त्यांच्या जाहिरातींमध्ये मधुमेह आणि श्वसन आजारांना बरे केले जाईल असे सांगितले गेले होते. अगदी कोरोनावरील औषध आले असून त्यामुळे कोरोना हद्दपार केला जाईल असा दावा केला होता पण हे दावे आता खोटे ठरायला लागले आहेत. न्यायालयाने समन्स बजावल्यामुळे आता पुढे काय होते याची ग्राहकांना उत्सुकता लागली आहे. 

देशाला फसवले जातेय - 
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारलाही फटकारले होते, कारण केंद्र सरकारने पतंजलीवर कोणतीही कारवाई केली नाही. संपूर्ण देशाला फसवले जात असूनही सरकारने डोळेझाक केली आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणी आजपर्यंत कोणतीही कारवाई का झाली नाही, असा सवालही न्यायालयाने सरकारला केला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केली होती याचिका - 
या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन IMA ने याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांच्यावर ॲलोपॅथीसारख्या हायटेक मेडिकल सिस्टीमला बदनाम केल्याचा आरोपही करण्यात आला होता. याचिकेत म्हटले आहे की, खोट्या अफवा पसरवून लोकांच्या मनात कोरोना लसीबाबतही संकोच निर्माण केला जात आहे.

आणखी वाचा - 
सर्वोच्च न्यायालयाने सीएएवरील स्थगितीला दिला नकार, अधिक माहिती घ्या जाणून
गडचिरोली येथे चार नक्षलवादी ठार, लोकसभा निवडणुकीवेळी गडबड करण्याचा रचला होता कट