पश्चिम आशियातील इराणमध्ये तणाव वाढला, इस्रायलच्या हल्ल्याच्या भीतीने भारतीय विमानांनी हवाई मार्गच बदलला

| Published : Apr 13 2024, 01:35 PM IST / Updated: Apr 13 2024, 02:23 PM IST

air india 11.jp

सार

महिन्याच्या सुरुवातीला इस्रायली हल्याचा बदल घेण्यासाठी दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर बदल घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

महिन्याच्या सुरुवातीला इस्रायली हल्याचा बदल घेण्यासाठी दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर बदल घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याच घटनांमुळे भारताच्या विमानांनी इराणी हवाई क्षेत्रातून उड्डाण घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या फ्लाईटने मार्ग बदलून लांबचा मार्ग निवडल्याचे यामध्ये दिसत आहे. 

बदललेल्या उड्डाणामुळे वेळ वाढला? 
या बदललेल्या उड्डाणामुळे फ्लाईटचा वेळ वाढला असल्याचे दिसत आहे. युरोपला जाणारे सर्व उड्डाणे आता दोन तास उशिराने पोहचतील असं सांगण्यात आले आहे. पण मध्य पूर्वेला जाणाऱ्या उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. इस्राइल आणि इराण या दोन देशांमध्ये होत असलेल्या या वादग्रस्त घटनेमुळे त्याचे दूरगामी परिणाम घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षांनी काय मत केले व्यक्त? - 
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी यावर मत व्यक्त करताना म्हटले आहे की, “इराणने अल्पावधीत इस्राइलवर हल्ला करेल अशी त्यांची अपेक्षा होती. अशा अडचणीच्या प्रसंगी अमेरिका इस्राइल सोबत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही इस्राइलच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही यासाठी समर्पित असून इराणला त्यांच्या इराद्यांमध्ये यशस्वी होऊ देणार नाही असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. यावर एका संरक्षण अधिकाऱ्याने त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याने म्हटले आहे की, ”प्रादेशिक प्रतिबंधक प्रयत्नांना चालना देण्यासाठी आणि अमेरिकन सैन्यासाठी सैन्य संरक्षण वाढवण्यासाठी अतिरिक्त मालमत्ता या प्रदेशात वाढवण्यात येत आहे. 
 

आणखी वाचा - 
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील वेस्टफील्ड बॉडी जंक्शन शॉपिंग सेंटरमध्ये हल्लेखोराने लोकांवर केले चाकूने वार, घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल
Loksabha Election 2024 : राहुल गांधी यांची राज्यातील पहिली सभा आज, काँग्रेसच्या वादग्रस्त नेत्याच्या मतदारसंघात होणार प्रचाराचा शुभारंभ