सार

काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण दमाने उतरल्याचे सध्या परिस्थितीवरून दिसत आहे. विदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभा होणार असल्याची माहिती समजली आहे. राहुल गांधी शनिवारी विदर्भात सभा आहे. 

Loksabha Election 2024 : काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण दमाने उतरल्याचे सध्या परिस्थितीवरून दिसत आहे. विदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभा होणार असल्याची माहिती समजली आहे. राहुल गांधी शनिवारी विदर्भातील साकोली येथे सभेला येणार असून ही त्यांची महाराष्ट्रातील पहिलीच सभा असल्याची माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. रविवारी मल्लिकार्जुन खर्गे यांची नागपुरात सभा होणार असून प्रियांका गांधी यांच्या सभेच्या बाबतीत मात्र अजूनही संदिग्धता आहे. 
 

नाना पटोले यांच्या मतदारसंघातून राहुल गांधी प्रचाराला करणार सुरुवात - 
नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे प्रचाराला सुरुवात करणार आहेत. ते शनिवारी नागपुरात विमानाने दाखल होणार असून त्यानंतर ते साकोली येथे हेलिकॅप्टरने जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांची सभा साकोली येथे दुपारी चार वाजता होणार असून त्या सभेसाठी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांची विदर्भात पहिलीची सभा होणार असून या सभेतून कार्यकर्ते आणि नेते लोकसभा निवडणुकीच्या आगामी प्रचाराला सुरुवात करणार आहेत. 
 

प्रियांका गांधी कुठे घेणार सभा? - 
काँग्रेस नेत्यांमध्ये राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यानंतर प्रियांका गांधी यांच्या सभांना मोठी मागणी असल्याची माहिती समोर येत आहे. ठीक ठिकाणावरून प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्या सभांच्या तारखांची चौकशी केली जात आहे. चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी प्रियांका गांधी सभा घेणार होत्या. पण अचानक इतर ठिकाणी सभांच्या तारखा असल्यामुळे त्यांना येथे सभा घेणे शक्य होणार नाही. 

पण त्याच्यानंतरच्या तारखा सभेसाठी घेण्याचे प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चालू आहेत. प्रतिभा धानोरकर उभ्या असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पती बाळू धानोरकर हे आधी खासदार होते. पण त्यांचे अचानक निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त होती. आता या ठिकाणी प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट मिळाले आहे. या दोघांमध्ये येथे सरळ लढत होत असून भाजपने सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी प्रयत्न चालवले आहेत. 
आणखी वाचा - 
PM नरेंद्र मोदींच्या सभेवेळी सोन्याने नटलेल्या महिलेची चर्चा, नक्की आहे तरी कोण?
'या' व्यक्तीने केली 200 कोटींची संपत्ती दान, गुजरातमधील जोडपं आणि मुलं, मुली होणार भिक्षु