सार

Australia Sydney Stabbing :ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकूच्या हल्यात अनेकजण जखमी झाल्याची माहिती समजली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Australia Sydney Stabbing : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकूच्या हल्यात अनेकजण जखमी झाल्याची माहिती समजली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना सिडनीतील वेस्ट फीड बॉडी जंक्शन शॉपिंग सेंटरमध्ये घडली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

शॉपिंग सेंटरमध्ये नेमकं घडलं काय? 
ऑस्ट्रेलियामध्ये चाकूने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यावेळी पोलिसांना या घटनेची माहिती कळल्यामुळे त्यांनी येथील उपस्थित नागरिकांना तातडीने बाहेर काढले आणि या गोंधळाच्या दरम्यान गोळीबार झाल्याची प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी माहिती दिली आहे. एका साक्षीदाराने येथून पोलिसांसोबत जाण्याच्या आधी एका महिलेला जमिनीवर पडलेलं पाहिलं असल्याची माहिती त्याने दिली आहे. हल्लेखोराने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्याची माहिती दिली आहे. 

सदर घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर झाले व्हायरल - 
येथे कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली आहे का नाही याबाबतची माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही. या हल्ल्याच्या वेळी प्रचंड गोंधळ झाला होता आणि यावेळी पोलिसांनी बचत मोहीम राबवली. यावेळी येथील हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समजली आहे. पोलिसांनी या क्षेत्रात येण्यास लोकांना मज्जाव केला आहे.चाकूने हल्ला केल्लेल्या व्यक्तीला पोलिसांनी मारण्याच्या आधी त्याने चार जणांवर वार केले होते. त्यामुळे त्या चौघांना कोणत्या प्रकारची दुखापत झाली, याबद्दलची माहिती अजून समजलेली नाही. 
आणखी वाचा - 
PM नरेंद्र मोदींच्या सभेवेळी सोन्याने नटलेल्या महिलेची चर्चा, नक्की आहे तरी कोण?
'या' व्यक्तीने केली 200 कोटींची संपत्ती दान, गुजरातमधील जोडपं आणि मुलं, मुली होणार भिक्षु