सार

लग्नसोहळा म्हटलं की, पाहुण्यांची रेलचेल असते. पाहुण्यांचा मानपान ते लग्न सोहळा होईपर्यंत धावपळच असते. पण जेवणात मटण मिळाले नाही म्हणून लग्न मोडल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.

Telangana  Marriage Broken Over Mutton : आतापर्यंत लग्न मोडण्याची वेगवेगळी कारणे तुम्ही ऐकली असतील. पण कधी जेवणासाठी मटण दिले नाही म्हणून लग्न मोडल्याचा प्रकार ऐकलाय का? खरंतर ही बाब हैराण करणारी असून तेलंगणातील असल्याचे समोर आले आहे.

लग्नाच्या जेवणात मटण मिळाले नाही म्हणून नवं वराने लग्नालाच नकार दिला. वराला खूप समजावले तरीही तो लग्नासाठी तयार झाला नाही. नक्की हे काय प्रकरण आहे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

तेलंगणातील मटणामुळे मोडले लग्न
तेलंगणामधील निजामबाद जिल्ह्यात राहणाऱ्या तरूणीचा विवाह जगतियाल जिल्ह्यात राहणाऱ्या एका मुलासोबत होणार होता. दोघांचा नुकताच साखरपुडाही झाला होता. या दोघांच्या परिवाराने लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरविले होते.

लग्नाच्या दिवशी पाहुण्यांसाठी जय्यत तयारी केली होती. तसेच जेवणासाठी नॉन-व्हेज फूड देखील ठेवले होते. पण त्यानंतर जो काही प्रकार घडला यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.

नक्की काय घडले?
लग्नासाठीच्या सर्व गोष्टी व्यवस्थितीत सुरू होत्या. पण लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना जेवणात मटण मिळाले नाही म्हणून ते संतप्त झाले. हिच गोष्ट वधूच्या नातेवाईकांसोबत घडली.

यावरून वराच्या मंडळींना या गोष्टीमुळे चिड आली आणि प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले गेले. लग्नादरम्यान स्थिती अशी निर्माण झाली की, चक्क पोलिसांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली. पण काहीही झाले नाही आणि लग्न मोडले गेले.

वराने मोडले लग्न
पोलिसांनी वराच्या घरातील मंडळींना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ते लग्नासाठी तयार झाले नाहीत. वराच्या मंडळींचे हे म्हणणे होते की, वधूच्या घरातील मंडळींनी जेवणात मटण न दिल्याने त्यांचा अपमान झाला आहे.

आणखी वाचा: 

Viral Video: हिमाचलमध्ये वाहतूक कोंडीपासून दूर राहण्यासाठी पर्यटकाने लढवली शक्कल, नदीतून चक्क चालवली कार

फ्रान्समध्ये अडकलेले विमान मुंबईत दाखल, 276 प्रवासी परतले

Swiggy Instamart : या महिन्यात सर्वाधिक ऑर्डर करण्यात आले कंडोम, स्विगी इंस्टामार्टच्या रिपोर्टमधील माहिती