सार

हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाने वाहतूक कोंडीपासून बचाव करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल होत आहे.

Himachal Viral Video : हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिटी व्हॅली (Spiti Valley) येथील एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पिटी व्हॅलीतील चंद्रा नदीत (Chandra River) महिंद्रा कंपनीची थार गाडी (Mahindra Thar Car) एका व्यक्ती चालवताना दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर आता पोलीस अधीक्षक मयंक चौधरी यांनी कार्यवाही केली आहे.

मयंक चौधरी यांनी म्हटले की, स्पिटी व्हॅलीतील एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यामध्ये एक थार गाडी चंद्रा नदीतून चालवली जात असल्याचे दिसत होते. या प्रकरणात कार चाकलाने वाहतूकीचे नियम धाब्यावर ठेवल्याचेही चौधरी यांनी म्हटले. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून जिल्हा पोलिसांनी स्पिटी व्हॅलीतील चंद्रा नदीजवळ पोलीस तैनात केले आहेत.

प्रवाशाने जीव धोक्यात घालून केले काम
सध्या हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिटी व्हॅली आणि कुल्लू-मनाली(Kullu Manali), शिमाला (Shimla) येथे थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक खूप गर्दी करत आहेत. अशातच पर्यटक काही स्थानिक नियम मोडून आपला जीव धोक्यात टाकत आहेत. 

तापमानाचा पारा मायनसमध्ये गेलाय तरीही लाहौल स्पिटी आणि कुल्लू पोलिसांचे कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तरीही काही पर्यटक नियम मोडताना दिसून येत आहेत. वाहतूक कोंडीच्या समस्येपासून आता तर पर्यटकाने थार गाडी थेट नदीत उतरवली.

पोलिसांनी ठोठावला दंड
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लाहौल स्पिटी पोलिसांनी वाहन चालकाच्या विरोधात कार्यवाही केली. चालकाने वाहतूकीचे नियम मोडल्याने त्याला 3 हजार पाचशे रूपयांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे.

दुसऱ्या बाजूला व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे की, कार चालक थार गाडी चंद्रा नदीतून चालवत आहे. नदीच्या एका किनाऱ्यापासून ते दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत चालकाने गाडी चावल्याचेही दिसतेय. सध्या चंद्रा नदीच्या पाण्याची पातळी फार कमी असल्याने त्याला नदीतून गाडी चालवणे सहज शक्य झाले आणि सुदैवाने तो दुर्घटना होण्यापासून दूर राहिला.

आणखी वाचा: 

फ्रान्समध्ये अडकलेले विमान मुंबईत दाखल, 276 प्रवासी परतले

जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ पुन्हा Down, युजर्सकडून तक्रारींचा पाऊस

Savitri Jindal : देशातील सर्वात श्रीमंत महिला, कमाईमध्ये अंबानी-अदानींनाही सोडले मागे