सुनीता केजरीवाल यांनी पती अरविंद केजरीवाल यांचा सिंह म्हणून केला उल्लेख, तुरुंगातून दिल्या 6 हमी

| Published : Mar 31 2024, 01:40 PM IST / Updated: Mar 31 2024, 01:41 PM IST

Sunita Kejriwal Rally

सार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर दिल्लीतील घडामोडींचा वेग आला आहे. नवी दिल्लीत रविवारी विरोधकांच्या झालेल्या रॅलीला संबंधित करताना अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीने पतीला सिंह म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर दिल्लीतील घडामोडींचा वेग आला आहे. नवी दिल्लीत रविवारी विरोधकांच्या झालेल्या रॅलीला संबंधित करताना अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीने पतीला सिंह म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी ईडी अरविंद केजरीवाल यांना जास्त काळ कोंडून ठेवू शकत नाही असे म्हटले आहे. इंडिया आघाडीच्या सभेमध्ये सुनीता केजरीवाल यांनी लोकांना संबंधित केले, तेव्हा त्यांनी हे मत व्यक्त केले होते. 

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी म्हटले आहे की, माझ्या पाटील तुरुंगात पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले. त्यांनी अरविंद केजरीवाल यांनी दिलेलं पत्र वाचून दाखवल्यानंतर आपले मत व्यक्त केले आहे. केजरीवाल यांनी तुरुंगात असताना राजीनामा द्यावा का, अरविंद केजरीवाल यांना जास्त काळ तुरुंगात ठेवणे पंतप्रधानांना जमणार नाही असे सुनीता केजरीवाल यांनी यावेळी म्हटले आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी गेल्या काही दिवसांपासून रोज एक्स प्लॅटफॉर्मवरून आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एक्स प्लॅटफॉर्मची मदत घेतली. सुनीता केजरीवाल या दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री बनतील असे म्हटले जात आहे पण आता भविष्यात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कोणता निर्णय घेतला जातो हे लवकरच दिसून येईल. 
आणखी वाचा - 
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींना 'भारतरत्न' देऊन केले सन्मानित, पंतप्रधान नरेंद्र मोदी होते उपस्थित
Video : ट्रॅफिकमध्ये UPSC परीक्षेचा व्हिडीओ पाहणारा झोमॅटो बॉय झाला व्हायरल, इंटरनेटवर होत आहे कौतुक