सार
भारतीय भारत-चीन सीमेजवळ पेंगाँग सरोवराच्या किनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका भव्य पुतळ्याचे अनावरण केले आहे.
नवी दिल्ली: भारतीय लष्कराने गुरुवारी एक ऐतिहासिक पाऊल उचलत भारत-चीन सीमेजवळ पेंगाँग सरोवराच्या किनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १४,३०० फूट उंचीवर एका भव्य पुतळ्याचे अनावरण केले आहे. लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले.
लेहमधील लष्कराच्या १४ व्या तुकडीने म्हटले आहे की, या महान राजाबद्दलचा आदर आणि त्यांनी दिलेला वारसा कायम प्रेरणेचा स्त्रोत असल्याने हा पुतळा उभारण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर डेमचोक व देपसांग भागांतून लष्कर मागे घेण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर काही आठवड्यांनी हे अनावरण करण्यात आले आहे.