सार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेतली असून मला यामधून मुक्त करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्रात महायुतीची कारभारी चांगली झाली नसून त्यांनी फक्त १७ जागा जिंकल्याचे सांगण्यात आले आहे. या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांनी चक्क पदाचा राजीनामा देऊन मला पराभव मान्य आहे असे म्हटले आहे.त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आता ते खरंच राजीनामा देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी 
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी मी घेत असून पक्षाने मला पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मला पराभव मान्य असून नेतृत्वातून बाहेर करावे असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी सरकारमधून मोकळे करण्यात यावे अशी पक्षाकडे मागणी केली होती. 

विरोधक नॅरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी - 
विरोधक सरकारविरोधात नॅरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाले असे यावेळी सांगण्यात आले. संविधान विरोधी, शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या. त्यामुळे विरोधी पक्षाला याचा मोठ्या प्रमाणावर यश आल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पण देवेंद्र फडणवीस यांच्या अशा बोलण्यामुळे भाजपची पंचाईत झाली आहे. 
आणखी वाचा - 
Breaking : एनडीएच्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ जून रोजी तिसऱ्यांदा घेणार शपथ
लोकसभा निवडणूक 2024 निकाल: 'या' प्रमुख नेत्यांना विजय मिळाला, पराभवाने अनेक मोठ्या चेहऱ्यांची मने मोडली