Team India Victory Parade in Mumbai : ढोल ताशाच्या गजरात टीम इंडियाच्या जल्लोषासाठी वानखेडे स्टेडिअमवर खचून गर्दी पाहायला मिळत आहे. 

Team India Victory Parade in Mumbai : टी20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघाली. यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

जगजेत्या टीम इंडियाची मुंबईत ओपन डबल डेकर बसमधून विजयी मिरवणूक निघेल. त्यासाठी दुपारपासूनच चाहत्यांनी नरीम पॉईंटवर गर्दी केली. दुपारपासूनच चाहत्यांनी नरीम पॉईंटवर गर्दी केली. 

वानखेडे स्टेडियमही फूल्ल झालेय. चाहत्यांची गर्दी वाढत असतानाच मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली.धो धो पावसातही चाहत्यांचा उत्साह कायम होता. रस्त्यावर चाहते दुतर्फा थांबले होते. वानखेडेमध्ये छत्र्या उघडून चाहते बसले होते.जोरदार वाऱ्यासह जसा पाऊसही टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत सहभागी झाला होता.

चाहत्यांनीही या पावसात टीम इंडियाला उत्साहात सपोर्ट कऱण्यासाठी उभे राहिले होते. मरीन ड्राईव्ह चाहत्यांच्या रंगात नाहून निघाले होते. 

मुंबईकरांच्या स्पिरिटचे सोशल मीडियावर कौतुक होतंय. विजयी मिरवणूक होणार असल्याने चाहत्यांचा जल्लोष वाढला आहे. लाखोंचा जनसागर लोटल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा : 

T20 World Cup 2024 : रोहित-राहुलचा हात धरून पंतप्रधानांनी दाखवून दिले की ते खरे नेते का आहेत, मोदींचे होतेय सर्वत्र कौतुक