केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या विस्तारात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिले जाणार असून, राज्यमंत्रिपदासाठी इतर खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

दिल्ली: केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये १ कॅबिनेट मंत्रिपद आणि १ राज्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. याबद्दलची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्यमंत्रिपदासाठी सुरु झालं लॉबिंग 

श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार आहे. त्यानंतर राज्यमंत्रिपदासाठी फुटीर खासदारांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. आज अमित शाह यांच्या उपस्थितीत सर्व खासदारांची बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांनी त्यांच्या खासदारांची यावेळी बैठक घेतली असून त्यांनी सूचना केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या सूचना 

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या खासदारांना यावेळी काही सूचना केल्या आहेत. त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना झाले. मागील वेळी श्रीकांत शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपद नाकारलं होतं. त्यांच्या ऐवजी प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं. पण यावेळी श्रीकांत शिंदे कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान होतील अशा शक्यता निर्माण झाली आहे.