
Manoj Jarange
हैदराबादमध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती आणि उपसमितीने फारसी व उर्दू वाचकांना सोबत न्यावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. हैदराबाद जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करावे, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. सातारा आणि कोल्हापूर संस्थानातील नोंदींची प्रक्रियाही सुरू करण्याची मागणी केली. ७ डिसेंबरपासून राज्यव्यापी दौरा करून कुणबी नोंदी, प्रमाणपत्रे, वैधता, SEBC, सारथी, महामंडळ आणि शैक्षणिक अडचणी जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दौऱ्याचे नियोजन १ डिसेंबरला जाहीर करण्याचा मानस असून, या दौऱ्यात सभा किंवा बैठका होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.