पाकिस्तानमध्ये सोशल मीडियाचा 'हा' प्लॅटफॉर्म बंद, वापरकर्त्यांनी या निर्णयाबद्दल व्यक्त केला संताप

| Published : Apr 17 2024, 06:26 PM IST

Social media platform X
पाकिस्तानमध्ये सोशल मीडियाचा 'हा' प्लॅटफॉर्म बंद, वापरकर्त्यांनी या निर्णयाबद्दल व्यक्त केला संताप
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सबाबत एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. येथे एक्स हा प्लॅटफॉर्म बंद करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सबाबत एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. येथे एक्स हा प्लॅटफॉर्म बंद करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून या प्लॅटफॉर्मबाबत या समस्या नोंदवण्यात आल्या होत्या पण याबाबत कोणतीही कारवाई आधी करण्यात आली नव्हती, ती आता करण्यात आली आहे. 

पाकिस्तानमध्ये का बंद करण्यात आले एक्स? 
पाकिस्तानमध्ये एक्सचा वापर आता पूर्णपणे बंद केला जाणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने लेखी न्यायालयात याबाबतची माहिती दिली आहे. पाकिस्तानमध्ये एक्स बंद केल्यामुळे आता हा निर्णय घेतला गेला आहे. 

एक्स प्लॅटफॉर्मची मालकी कोणाची? - 
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हा इलॉन मस्क यांच्या मालकीचा आहे. एक्स प्लॅटफॉर्म मस्क यांनी विकत घेतल्यानंतर त्यांनी यामध्ये अनेक नवीन बदल घडवून आणले आहेत. येथे जास्तीत जास्त क्रिएटर्सने यावे आणि या प्लॅटफॉर्मचा वापर करावा यासाठी एक्सकडुन पेमेंट देण्यात येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्समधील या बदलामुळे त्याचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. 
आणखी वाचा - 
अयोध्याच्या राम मंदिरातील 'सूर्य टिळक' कार्यक्रम पाहिलात का? त्यामागील विज्ञान घ्या समजून
प्रसिद्ध YouTuber अभ्रदीप साहा उर्फ अँग्री रँटमॅन याचं वयाच्या 27 व्या वर्षी निधन