सार

भारतातील लोकप्रिय युट्युबर अभ्रदीप साहा याचे वयाच्या 27 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याला अँग्री रँटमॅन म्हणूनही देखील ओळखले जात होते. गेल्या महिन्यात त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर त्याचे आज निधन झाले आहे.

भारतातील लोकप्रिय युट्युबर अभ्रदीप साहा याचे वयाच्या 27 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याला अँग्री रेंटमन म्हणूनही देखील ओळखले जात होते. गेल्या महिन्यात त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर त्याचे आज निधन झाले आहे. त्याच्या निधनामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. उघडपणे अजून कोणीही कारण सांगितलेले नाही. नेमके कारण उघड झाले नसले तरी, शस्त्रक्रियेनंतर झालेल्या वैद्यकीय समस्येमुळे त्याच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

अँग्री रँटमॅन या नावाने तो प्रसिद्ध युट्युबर होता. जास्त करून तो खेळावर आधारित व्हिडिओ कंटेंट तयार करायचा. त्याच्या व्हिडीओ कंटेंटमध्ये बहुतेक व्हिडिओ विशेषतः फुटबॉलवर बनवत असे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहे.अभ्रदीप साहा उर्फ ​​अँग्री रँटमॅनचे यूट्युबरवर 481k पेक्षा जास्त सदस्य आणि Instagram वर 119k फॉलोअर्स आहेत. त्याच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे. तो मूळचा कोलकाताचा रहिवासी होता. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1996 रोजी झाला होता.एवढ्या कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.