एकनाथ शिंदेंनी सांगितलं, तिसऱ्या मुंबईत काय होणार

Share this Video

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या मुंबईच्या विकासाबाबत महत्त्वाची माहिती दिली. तिसऱ्या मुंबईमध्ये नवीन एअरपोर्टसोबत एड्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी आणि एरोसिटी उभारली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या भागात मोठ्या प्रमाणावर ग्रोथ हब तयार होत असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन केले जात असल्याचे शिंदे म्हणाले.या विकासामुळे हजारो आणि लाखो लोकांना रोजगार मिळेल तसेच या संपूर्ण भागाचा कायापालट होईल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.यावेळी एकनाथ शिंदे यांनी ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’बाबतही भाष्य केले. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी सुरू असलेल्या या रक्तदान उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून सुमारे 1200 पैलवान रक्तदानासाठी सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदानामुळे तीन लोकांचे प्राण वाचू शकतात, असे सांगत त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक केले.

Related Video