सार

सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी डायरीमधील काही पान शेअर करण्यात आली आहेत. यामध्ये महात्मा गांधींबद्दलच्या काही खास गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत.

Shaheed Diwas 2024 : प्रत्येक वर्षी 30 जानेवारीला देशरात ‘शहीद दिवस’ साजरा केला जाते. या दिवशी वर्ष 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. महात्मा गांधींनी स्वतंत्रता आंदोलनाचे नेतृत्व केले होते. गांधींजी गुजरात येथे राहणारे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) आयुष्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव राहिल्याचे त्यांच्या खासडी डायरीतून कळते. पंतप्रधानांनी महात्मा गांधींबद्दल सखोल अभ्यास केला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींचे विचार आपल्या खासगी डायरीतही लिहायचे.

महात्मा गांधींबद्दलच्या पंतप्रधानांच्या डायरीतील खास गोष्टी 
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर Modi Archive अकाउंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी डायरीतील काही पान शेअर केली आहेत.

30 जानेवारीला शहीद दिवस साजरा केला जातो
वयाच्या 78 व्या वर्षी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीतील बिर्ला हाऊस परिसरात नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या झाडल्या होत्या.

महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ 30 जानेवारीला ‘शहीद दिवस’ साजरा केला जातो. या निमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तीन सैन्याच्या प्रमुखांनी राजघाटावर महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली.

आणखी वाचा : 

Pariksha Pe Charcha 2024 : 'प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यास तयार राहा', वाचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले..

दूध विक्री करणाऱ्याची मुलगी बनली IAS, शिक्षणाची फी भरण्यासाठीही नव्हते पैसे

Halwa Ceremony : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून हलवा समारंभ संपन्न, येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार