Fali S Nariman: सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस नरिमन यांचे निधन; काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी केला शोक व्यक्त

| Published : Feb 21 2024, 11:20 AM IST / Updated: Feb 21 2024, 01:37 PM IST

Fali S Nariman
Fali S Nariman: सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस नरिमन यांचे निधन; काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी केला शोक व्यक्त
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील फली एस नरिमन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांना भारत सरकारच्या सर्वोच्च पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

 

Fali S Nariman : प्रसिद्ध घटनात्मक कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील फली एस नरिमन (Fali S Nariman) यांचे बुधवारी (21 फेब्रुवारी) निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी दिल्ली येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली.

 

 

त्यांनी पुढे म्हटले की, ते महान वकीलच नाही तर सर्वोत्कृष्ट वकिलांपैकी एक होते. त्यांच्याशिवाय न्यायालयाचा मार्ग पूर्वीसारखा कधीच राहणार नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनीही इंस्टाग्रामवर सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील फली एस नरिमन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत पोस्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, जेष्ठ वकील आणि घटनात्मक नागरी स्वातंत्र्याचे समर्थक फली एस नरिमन यांच्या निधनाने कायदेशीर व्यवस्थेचे मोठे नुकसान झालं आहे. त्यांची तत्वांप्रती बांधिलकी अतूट होती. कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांसाठी मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

फली एस नरिमन यांचे कार्य -
फली एस नरिमन यांचा जन्म 10 जानेवारी 1929 रोजी म्यानमारमधील पारशी कुटुंबात झाला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरु केली होती. नरिमन हे नोव्हेंबर 1950 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे वकील झाले. त्यानंतर 1961 मध्ये ते वरिष्ठ वकील बनले. 1972 मध्ये दिल्लीत येण्यापूर्वी मुंबईत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात काम केलं होत. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी भारताचे ‘अतिरिक्त सॉलिसिटर जनरल’ म्हणून काम केले.

नरिमन यांचे वय 38 वर्षांपेक्षा कमी असताना त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्याची संधी नाकारली होती. फली एस नरिमन यांनी 1991 ते 2010 पर्यंत ‘बार असोसिएशन ऑफ इंडियाचे’ अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यांच्या न्याय क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ यासह देशातील काही सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

आणखी वाचा - 
पोकलेन मशीन, मॉडिफाइड ट्रॅक्टर : ‘दिल्ली चलो’चा नारा देत शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत WATCH VIDEO
बायको आपल्या हसण्याला भाळण्यासाठी व्यावसायिकाने लग्नाआधी केली खास सर्जरी, झाला मृत्यू
चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पुन्हा मतमोजणी करण्याचे आदेश