सार
Sam Pitroda Viral Video : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Sam Pitroda Viral Video : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जोमाने पूर्वतयारी सुरू करण्यात येत आहे. राहुल गांधी देखील देशभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये दौऱ्यांचे आयोजन करत आहेत. पण त्यांच्या पक्षातील नेत्यांच्याच वादग्रस्त विधानांमुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी एका मुलाखतीदरम्यान स्वतःच्याच पक्षाला अडचणीत आणणारे विधान केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सॅम पित्रोदा यांनी नेमके काय म्हटले आहे?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबतचा एक किस्सा सांगत असल्याचे दिसत आहे. पित्रोदा म्हणाले की, “एकेदिवशी संध्याकाळी मी आणि माझी पत्नी राजीवजी यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या हातातून रक्त येत असल्याचे यावेळेस मी पाहिले. तेव्हा मी त्यांना विचारले, हाताला काय लागले? यावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून धक्का बसला. राजीव गांधी म्हणाले की, आज मी जवळपास 5 हजार लोकांशी हस्तांदोलन केले आणि हे सर्व लोक शेतकरी, कष्टकरी होते. त्यांचे हात खूप कडक असतात.”
नेटकऱ्यांनी केली टीका
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सॅम पित्रोदा यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. सोशल मीडिया युजर्स म्हणाले की, देशातील गरीब जनतेची खिल्ली उडवण्याचा हा प्रकार आहे. आणखी एका युजरने म्हटले की, हे विधान म्हणजे श्रीमंतीचा देखावा करण्यासारखे आहे.
तर आणखी एका नेटकऱ्याने आपला राग व्यक्त करत म्हटले की, हा माणूस स्वत:ला विचारवंत म्हणवतो, पण स्वतः गुलामांची भाषा बोलत आहेत.
रोहन गुप्ता नावाच्या युजरने लिहिले की, काँग्रेसची दुर्दशा होण्यास याच गोष्टी कारणीभूत आहेत. सोशल मीडियावर युजर्संनी पित्रोदांचे मीम्सही शेअर केले आहेत.
आणखी वाचा
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिरात बसवले जाणार सुवर्णद्वार, पाहा PHOTO
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली व किती दिली? जाणून घ्या