सार

Ayodhya Ram Mandir Gold Gate :अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर उत्कृष्ट व सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर हत्ती आणि कमळा फुलासह अनेक पौराणिक चित्रे कोरण्यात आली आहेत.

Ayodhya Ram Mandir Gold Gate : अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या भव्य मंदिरामध्ये सोन्याचे दरवाजे बसवण्यात येणार आहेत.

सोन्याचा मुलामा असलेले प्रवेशद्वार सुमारे 12 फूट उंच आणि 8 फूट रुंद आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर सोन्याचे दरवाजे बसवले जात आहेत. पहिले सुवर्णद्वार बसवण्यात आले असून येत्या तीन दिवसांत आणखी तीन सुवर्णद्वार बसवले जाणार आहेत. मंदिराच्या गर्भगृहातील सर्वात मोठ्या प्रवेशाद्वारासह 10 दरवाजे बसवण्याची चाचणीप्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मंदिरामध्ये बसवण्यात येणाऱ्या प्रवेशद्वारांवर सुंदर-उत्कृष्ट नक्षीकाम करण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर हत्ती, कमळ फुलासह कित्येक पौराणिक चित्रे देखील कोरण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. दिल्लीतील चार कारागिरांनी हे काम केले आहे.  

तांब्याच्या धातूवर देण्यात आला सोन्याचा मुलामा

श्री राम मंदिरामध्ये बसवण्यात आलेले प्रवेशद्वारे सागवान लाकडापासून तयार करण्यात आले आहेत. दरवाजाच्या साच्यावरील पहिला थर तांबे या धातूचा आहे. या धातूवर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. राम मंदिरामध्ये एकूण 46 दरवाजे बसवले जाणार आहेत. तळमजल्यावर जास्तीत जास्त 18 दरवाजे बसवण्यात येणार असल्याची माहिती आहे. श्री राम मंदिराचे मुख्य शिल्पकार चंद्रकांत सोमपुरा यांनी प्रवेशद्वाराचे डिझाइन तयार केले आहे.

16 जानेवारीपासून कार्यक्रमास सुरुवात

श्री राम मंदिरामध्ये 22 जानेवारीला रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. पण याकरिता 16 जानेवारीपासूनच विधी आणि पूजेस सुरुवात होणार आहे. या सोहळ्याची रामभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत.

आणखी वाचा : 

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली व किती दिली? जाणून घ्या

राम मंदिर उभारणीमध्ये सर्वात मोठे आव्हान कोणते होते? या व्यक्तीने केला खुलासा

राम मंदिर उभारणीत वापरलेल्या प्रत्येक दगडाचे 5 प्रकारे करण्यात आले परीक्षण, वाचा सविस्तर