Vibrant Gujarat Global Summit 2024 : भारताला विकसित देश बनवण्याचे आमचे ध्येय, PM मोदींनी सांगितला संकल्प

| Published : Jan 10 2024, 02:16 PM IST / Updated: Jan 10 2024, 04:39 PM IST

pm modi vibrant

सार

Vibrant Gujarat Global Summit 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील महात्मा मंदिरामध्ये व्हायब्रंट गुजरात समिट 2024चे उद्घाटन केले. यावेळेस पंतप्रधान मोदींनी जगभरातील दिग्गज नेत्यांचे स्वागत केले.

Vibrant Gujarat Global Summit 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिरामध्ये व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024चे उद्घाटन केले. यावेळेस पंतप्रधान मोदींनी जगातील दिग्गज नेत्यांचे स्वागत केले. 

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान पीटर फियाला, मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष फिलिप जिसिंटो न्युसी, तिमोर-लेस्टेचे राष्ट्राध्यक्ष जोस रामोस-होर्टा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उपस्थिती दर्शवली.

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये 34 देशांचा समावेश

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे आयोजन 10 जानेवारी ते 12 जानेवारीदरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये 16 संस्थांसह सुमारे 34 देश सहभागी झाले आहेत. 'गेटवे टू द फ्युचर' अशी या समिटची थीम आहे. 

विकसित राष्ट्राचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळेस म्हणाले की, “स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असताना भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करायचा आहे”. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 दरम्यान पंतप्रधान मोदींनी देशाच्या भविष्याची रूपरेषा सांगत आमचे उद्दिष्ट स्पष्ट असल्याचंही म्हटले. 

“येत्या 25 वर्षांत आम्ही स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करू. या शंभर वर्षांत आम्ही भारताला विकसित राष्ट्र बनवू. आज आमचे मित्र देश आमच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि हाच विश्वास विकासाचा आधार ठरत आहे”, असेही ते म्हणाले.

सिमटेक कंपनीचे ग्लोबल CEO काय म्हणाले?

दक्षिण कोरियन कंपनी सिमटेकचे ग्लोबल सीईओ जेफरी चुन म्हणाले की, गुजरातमध्ये मायक्रोन गुंतवणुकीच्या योजनेनंतर आता आम्ही भारतामध्ये गुंतवणुकीची तयारी करत आहोत. केंद्र व राज्य शासनाकडून सहकार्य मिळत आहे. आम्ही भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यास आणि गुजरातमध्ये हजारो रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास तयार आहोत.

कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक केली - मुकेश अंबानी 

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व एमडी मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स ही एक गुजराती कंपनी होती आणि कायम राहील. रिलायन्सने संपूर्ण भारतात 150 अब्ज डॉलर म्हणजेच 12 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये यापैकी एक तृतीयांशपेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या गुजरात राज्यात करण्यात आली आहे.

गौतम अदानींची मोठी घोषणा

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना म्हटले की, व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवून आखलेली सर्वोकृष्ट संकल्पना आहे. 

शिवाय गुजरातमध्ये दोन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही अदानींनी यावेळेस केली.

आणखी वाचा :

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिरात बसवले जाणार सुवर्णद्वार, पाहा PHOTO

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली व किती दिली? जाणून घ्या

राम मंदिर उभारणीत वापरलेल्या प्रत्येक दगडाचे 5 प्रकारे करण्यात आले परीक्षण, वाचा सविस्तर