MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली व किती दिली? जाणून घ्या

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली व किती दिली? जाणून घ्या

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली? जाणून घ्या माहिती…

2 Min read
Author : Harshada Shirsekar
| Updated : Jan 12 2024, 12:11 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
अयोध्येतील राम मंदिरासाठी देणगी
Image Credit : Asianet News

अयोध्येतील राम मंदिरासाठी देणगी

अयोध्येतील राम मंदिरासाठी देश-परदेशातील रामभक्तांनी उदार मनाने देणगी दिली आहे. रामभक्तांनी एवढी देणगी दिली की याद्वारे मिळालेल्या व्याजाच्या पैशातून मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण होईल, असे म्हटले जात आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
29
किती मिळाली देणगी?
Image Credit : Adobe Stock

किती मिळाली देणगी?

राम मंदिरासाठी आतापर्यंत 5 हजार कोटी रूपयांहून अधिक देणगी मिळाली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार मंदिराच्या समर्पण निधि खात्यात 3 हजार 200 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

39
मंदिरासाठी किती लोकांनी दिली देणगी
Image Credit : Social Media

मंदिरासाठी किती लोकांनी दिली देणगी

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार, राम मंदिर उभारणीसाठी आतापर्यंत जवळपास 18 कोटी रामभक्तांकडून 3 हजार 200 कोटी रुपयांची देणगी समर्पण निधि खात्यात जमा झाली आहे.

49
देणगीद्वारे मिळालेल्या पैशांची अशी केली गुंतवणूक
Image Credit : Asianet News

देणगीद्वारे मिळालेल्या पैशांची अशी केली गुंतवणूक

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार ट्रस्टने बँक खात्यामध्ये प्राप्त झालेल्या देणगीच्या पैशांची एफडीमध्ये गुंतवणूक केली. ज्याद्वारे मिळालेले व्याजाच्या पैशातूनच मंदिराचे आतापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले.

59
सर्वाधिक देणगी कोणी दिली?
Image Credit : Asianet News

सर्वाधिक देणगी कोणी दिली?

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांनी दिली आहे. त्यांनी मंदिरासाठी 11.3 कोटी रूपयांची देणगी दिली आहे.

69
मोरारी बापू यांच्या अनुयायांनीही दिली देणगी
Image Credit : Asianet News

मोरारी बापू यांच्या अनुयायांनीही दिली देणगी

अमेरिका, कॅनडा आणि यूकेमध्ये स्थायिक असलेल्या मोरारी बापू यांच्या अनुयायांकडूनही अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी 8 कोटी रूपयांची देणगी देण्यात आली.

79
सर्वाधिक देणगी देणारी दुसरी व्यक्ती
Image Credit : Adobe Stock

सर्वाधिक देणगी देणारी दुसरी व्यक्ती

राम मंदिर उभारणीसाठी गुजरातमधील हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी 11 कोटी रूपयांची देणगी दिली. ढोलकिया हे डायमंड कंपनी श्रीराम कृष्णा एक्सपोर्ट्सचे मालक आहेत.

89
पहिली देणगी कोणी दिली?
Image Credit : google

पहिली देणगी कोणी दिली?

राम मंदिर निर्माणासाठी देणगी घेण्याची सुरुवात 14 जानेवारी 2021 पासून झाली. त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 5 लाख रूपयांची देणगी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला चेक स्वरुपात दिली होती.

99
परदेशातूनही मिळाली देणगी
Image Credit : Asianet News

परदेशातूनही मिळाली देणगी

अमेरिकेतील एका रामभक्ताने स्वतःचे नाव जाहीर न करता राम मंदिर उभारणीसाठी 11 हजार रूपयांची देणगी दिली.

आणखी वाचा : 

अयोध्येतील भव्य श्री राम मंदिर रात्रीच्या वेळेस दिसेल अधिक सुंदर, पाहा मंत्रमुग्ध करणारा VIDEO

राम मंदिर उभारणीमध्ये सर्वात मोठे आव्हान कोणते होते? या व्यक्तीने केला खुलासा

राम मंदिर उभारणीत वापरलेल्या प्रत्येक दगडाचे 5 प्रकारे करण्यात आले परीक्षण, वाचा सविस्तर

About the Author

HS
Harshada Shirsekar

Recommended Stories
Recommended image1
Phone Charging: फोन चार्ज करताना ही चूक करताय? बॅटरी आणि फोन दोन्ही खराब होतील!
Recommended image2
India Healthcare: 'परदेशात सगळं छान नसतं', रात्री औषधं मिळाल्यावर माजी NHS डॉक्टरला आठवला भारत!
Recommended image3
Nepal Floods: मदत नाकारल्याच्या चर्चा खोट्या, नेपाळला हवीय विशेष आंतरराष्ट्रीय मदत
Recommended image4
Global Recognition: भारताच्या टेस्टिंग स्टँडर्ड्सचा जगात डंका, प्रल्हाद जोशींची मोठी घोषणा
Recommended image5
Untouchability: खर्गेंच्या सभेमुळे 'शुद्धीकरण'? हा तर दलितांचा अपमान - शशी थरूर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved