सार

Sam Pitroda Controversial Statement :  भारताविरोधी नेहमीच वादग्रस्त विधाने करणारे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने पित्रोदा यांचा राजीनामा स्विकार केला आहे.

Sam Pitroda Controversial Statement : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. पित्रोदा नेहमीच भारताविरोधी वादग्रस्त विधाने करतात. नुकत्याच एका विधानात सॅम पित्रोदा यांनी भारतीयांबद्दल वर्णद्वेषी विधाने केली होती. यावरुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावर काँग्रेसनेही पित्रोदांच्या भूमिकेवर स्वत:ला बाजूला केले.

काँग्रेसने स्विकारला पित्रोदांचा राजीनामा
काँग्रेसने सॅम पित्रोदांचा राजीनामा स्विकार केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सॅम पित्रोदांनी आपल्या मर्जीने राजीनामा दिला आहे असे म्हटले आहे. अशातच काँग्रेसने पित्रोदा यांचा राजीनामा स्विकार केला आहे असे म्हटले आहे.

दाक्षिणात्य नागरिकांवरून केले होते वादग्रस्त विधान
एका मुलाखतीत पित्रोदांनी भारताच्या विविधतेचा उल्लेख करत पित्रोदा यांनी म्हटले की, "पूर्वेकडील नागरिक चीनी नागरिकांसारखे दिसतात. पश्चिमेकडील अरब नागरिकांसारखे, उत्तरेकडील नागरिक शुभ्र वर्णीय असून दक्षिणेकडील नागरिक आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात. यामुळे काहीही फरक पडत नाही. आम्ही सर्वजण बहिणभाऊ आहोत."

काँग्रेसची सॅम पित्रोदांच्या विधानावर भूमिका
सॅम पित्रोदांनी केलेल्या विधानावर काँग्रेसने म्हटले की, आम्ही याचा स्विकार करत नाही. जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ पोस्ट शेअर करत म्हटले की, सॅम पित्रोदांनी भारताच्या विविधतेला जी उपमा दिली आहे ती अगदी चुकीची आहे. ती स्विकार केली जाणार नाही. काँग्रेस पक्ष सॅम पित्रोदांच्या उपमांचे खंडन करतो.

वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेसच्या प्रतिमेला धक्का
अमेरिकेत राहणारे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा भारतात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सातत्याने वादग्रस्त विधान करत काँग्रेसच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत होते. याआधी पित्रोदांनी वारसा हक्कावरून वादाला तोंड फोडले होते. त्यानंतर आता दक्षिण भारतातील नागरिकांना आफ्रिकन नागरिकांची उपमा दिलीय. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

आणखी वाचा : 

'15 मिनिटे नव्हे 15 सेकंदासाठी पोलिसांना हटवा....',ओवैसी भावडांना नवनीत राणांचे खुले आव्हान, म्हणाल्या...

नोकरीत आरक्षण देण्याबाबत पंडित जवाहरलाल नेहरूंची नेहमीच होती विरोधाची भूमिका, म्हणाले होते.…