सार

Reservation in Job : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेहमीच आरक्षणाचा विरोध केला. याबद्दल अनेकदा नेहरूंनी बोलूनही दाखवले होते. नेहरूंचे नेहमीच स्पष्ट मत असायचे की, आरक्षणामुळे व्यक्तीत हीन भावना येते.

SC, ST, OBC Reservation in Job : काँग्रेस (Congress) आताच नव्हे आधीपासूनच आरक्षणाच्या विरोधात लढत आहे. याबद्दल खुद्द भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांनी म्हटले होते. नेहरू यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, मी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सदस्यांना नोकरीत आरक्षण देण्याच्या विरोधात आहे. कारण यामुळए व्यक्तीमध्ये हीन भावना निर्माण होते. हीच बाब काँग्रेसचे अन्य नेत्यांकडूनही केली जात आहे. खरंतर आरक्षणाचा राग नुकताच सॅम पित्रोदा यांनी छेडला आहे.

सॅम पित्रोदाही आरक्षणाच्या विरोधात
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये सॅम पित्रोदा आरक्षणाच्या विरोधात बोलत असल्याचे दिसून येत आहेत. सॅम पित्रोदांनी म्हटले की, आयआयटी आणि आयआयएममध्ये आरक्षण देऊ नये. कारण आरक्षणामुळे आयआयटी आणि आयआयएमएमची स्थिती बिघडली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानताना काँग्रेस आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधानांनी म्हटले की, पंडित जवाहरलाल नेहरू देखील आरक्षणाच्या विरोधात होते. काँग्रेस आधीपासूनच आरक्षणाचा विरोध करत आहे. खरंतर, नेहरूही म्हणायचे, जर एससी, एसटी, ओबीसीमध्ये नोकरीत आरक्षण मिळण्यास शासकीय कामांचा स्तर बिघडला जाईल.

नक्की काय म्हणाले होते पंडित नेहरू?
पंडित नेहरू यांनी म्हटले होते की, मला कोणत्याही रुपात आरक्षण आवडत नाही. खासकरून नोकरीतील आरक्षण. मी अक्षमतेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि मध्यमतेकडे नेणाऱ्या कोणत्याही हालचालींच्या विरोधात आहे.

आरक्षणावरुन वाद
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच आरक्षणासंदर्भातील मुद्दा चांगलाच तापला आहे. देशात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यावरुन वादाला तोंड फुटले आहे. भाजपाकडून विरोधी पक्षाकडून मुस्लिमांना आरक्षण देऊ पाहत असल्याचा आरोप लावत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून ही आरक्षणावर बोलले जात आहे. अशातच भाजपा नेत्यांनी काँग्रेसवर धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा आरोप लावला आहे. दरम्यान, कर्नाटक आणि तेलंगणातही निवडणुकीच्या काळात आरक्षणाचा मुद्दा तापला गेलाय. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी म्हटले होते की, मुस्लिमांना आरक्षण देणे संविधानाच्या विरोधात आहे.

आणखी वाचा : 

झारखंडमध्ये पुन्हा एकदा सापडली लाखो रुपयांची रोकड, कारमधील पैसे मोजण्यासाठी बोलवावी लागली IT टीम

कोण आहेत आकाश आनंद, बसपाच्या महत्वपूर्ण नेत्यांपैकी आहेत एक