'15 मिनिटे नव्हे 15 सेकंदासाठी पोलिसांना हटवा...',ओवैसी भावडांना नवनीत राणांचे खुले आव्हान, म्हणाल्या...

| Published : May 09 2024, 11:41 AM IST / Updated: May 09 2024, 12:19 PM IST

Navneet Kaur Rana

सार

Hyderabad : अमरावतीमधील भाजपा खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी (8 मे) एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यासह त्यांचा लहान भाऊ अकबरुद्दीन यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता राजकरण तापले आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाआधी राजकरण पुन्हा एकदा तापले आहे. खरंतर, भाजपा नेत्या आणि अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. नवनीत राणा यांनी म्हटले की, काही वर्षांपूर्वी असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी एका विधानात म्हटले होते 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवल्यास आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. यावरुनच नवनीत राणा यांनी विधान केले आहे.

नवनीत राणांनी हैदराबादमध्ये निवडणुकीच्या प्रचार रॅलीला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवैसी यांच्या विधानावर पलटवार करत म्हटले की, जर 15 सेकंदासाठी पोलिसांना हटवल्यास लहान-मोठ्यालाही कळणार नाही कुठे आलाय आणि कुठे गेलाय.

अकबरुद्दीन यांना नवनीत राणांनी दिले सडेतोड उत्तर
नवनीत राणा यांनी म्हटले की, “लहान भाऊ, मोठा भाऊ बोलतोय पोलिसांना 15 मिनिटांसाठी हटवल्यास दाखवून देऊ शकतो आम्ही काय करू शकतो. तुम्हाला 15 मिनिटे लागतील, पण आम्हाला केवळ 15 सेकंदच पुरेशी आहेत. 15 सेकंदच पोलिसांना हटवल्यास कळणार नाही कोठून आलाय आणि कोठे गेलाय.” मंचावर येण्यासाठी केवळ 15 सेकंदच लागलीत असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे. दरम्यान, चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे ला होणार आहे. हैदराबाद येथून भाजपाने माधवी लता यांना निवडणुकीचे तिकीट दिले आहे. अशातच निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पोहोचलेल्या नवनीत राणा यांनी ओवैसी बंधुंना खुले आव्हान दिले आहे.

वारिस पठान यांचे नवनीत राणांना प्रतिउत्तर
नवनीत राणांच्या वादग्रस्त विधानावरुन एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठान यांनी प्रतिउत्तर दिले आहे. पठाण यांनी म्हटले की, भाजपाचे नेते निवडणुकीदरम्यान अशा प्रकारची विधाने करत आहे, जे खरंतर निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे. नवनीत राणांच्या विधानावर निवडणूक आयोगाने कार्यवागी करावी. कारण अशाप्रकारची विधाने केल्याने समाजात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. खरंतर हैदराबादमध्ये लोकसभेच्या जागेवर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि भाजपा उमेदवार माधवी लता निवडणुकीच्या रिंगणात आमनेसामने आहेत.

आणखी वाचा : 

नोकरीत आरक्षण देण्याबाबत पंडित जवाहरलाल नेहरूंची नेहमीच होती विरोधाची भूमिका, म्हणाले होते....

झारखंडमध्ये पुन्हा एकदा सापडली लाखो रुपयांची रोकड, कारमधील पैसे मोजण्यासाठी बोलवावी लागली IT टीम

 

Read more Articles on