केरळमधील कोझिकोड येथील महिला वन अधिकारी रोशनी यांनी 18 फूट लांबीच्या किंग कोब्राला अवघ्या 6 मिनिटांत रेस्क्यू केले. या धाडसाबद्दल त्यांचे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी कौतुक केले आहे. 

वन विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं काम बाहेरून पाहून खूप चांगलं वाटतं. पण ते करताना त्यांना किती मोठ्या धाडसाला सामोरं जावं लागत असेल याची माहिती आपल्याला नसते. अनेकवेळा त्यांना आपल्या जीवावर उदार होऊन काम करावं लागत असत. केरळमधील एक अशीच घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

केरळमधील महिला अधिकाऱ्याने किंग कोब्राला केलं रेस्क्यू 

केरळमधील कोझिकोड येथील महिला अधिकाऱ्यानं किंग कोब्राला रेस्क्यू केलं आहे. रोशनी या अ अधिकारी महिलेनं एका किंग कोब्राला चक्क ६ मिनिटांमध्ये रेस्क्यू केलं आहे. आता या महिलेचं चक्क भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी कौतुक केलं आहे. 18 फूट लांबीचा हा किंग कोब्रा पाहिल्यानंतरही पारुथिपल्ली रेंजच्या फॉरेस्ट बीट ऑफिसर रोशनी अजिबात डगमगल्या नाहीत.

विषारी कोब्राला धाडसाने पकडले 

केरळच्या तिरुअनंतपुरम येथील पेप्पारा अंकुमारुथुमूत निवासी भागातून ओढ्यात आंघोळ करताना स्थानिकांना किंग कोब्रा दिसला होता, या विषारी सापाला रोशनी यांनी अत्यंत धाडसाने पकडले, असे ट्विट राजन माढेकर यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी यांनी कोब्राला कसं पकडलं यावरचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केलं रिट्विट 

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. त्यांनी यावर बोलताना लिहिलं की, ''उत्साही, धाडसी आणि निडर राहणं हेच रोशनीच्या दिवसभरातील कामाचं मूल्यमापन'' असं सचिन यांनी लिहिलं आहे. ६ मिनिटांमध्ये किंग कोब्राला रेस्क्यू करण्याचे धाडस रोशनी यांनी करून दाखवले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Scroll to load tweet…

व्हिडिओला ३० लाख लोकांनी पाहिलं 

या व्हिडिओला ३० लाख लोकांनी पाहिलं असून ५ हजार पाचशे लोकांनी त्या ट्विटला रिट्विट केलं आहे. किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे आणि त्याचा सामना करणे सोपे नाही. हा साप खूप चपळ आणि धोकादायक आहे. तरीही, या महिला अधिकाऱ्याने हे बचाव अतिशय शांतपणे आणि निर्भयपणे पूर्ण केले.