सार

आज देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर परेडचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान हातात धनुष्य बाण घतलेल्या श्रीरामांचा रथ कर्तव्य पथावर पाहायला मिळाला.

Republic Day 2024 : भारतात आज (26 जानेवारी) 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर (Kartavya Path) परेडचे आयोजन करण्यात आले. परेडमध्ये वेगवेगळ्या राज्यांसह, केंद्र शासित प्रदेश आणि मंत्रलयांच्या रथाची झलक पाहायला मिळाली. यादरम्यान, उत्तर प्रदेशातील राम मंदिराची झलक दाखवण्यात आली.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये प्रगतीपथावर रामललांचे दर्शन घडवणारा रथ चालवला गेल्याचे दिसून येत आहे.

उत्तर प्रदेशाचे सौंदर्य दाखवणारी यंदाची थीम 'अयोध्या : विकसित भारत-समृद्ध विरासत' च्या आधारावर होती. प्रभू श्रीरामांच्या रथावर रामललांचे बालरुप दिसून येत आहे. याशिवाय रामललांच्या हातात धनुष्य बाण असल्याचेही दिसतेय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर ट्विट करत म्हटले की, देशातील सर्व परिवारातील सदस्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!

आणखी वाचा : 

Republic Day 2024 : कर्तव्य पथावरील परेडचा पाहा शानदार VIDEO

Republic Day 2024 : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे भारतीय विद्यार्थ्यांना गिफ्ट, या सुविधेची केली घोषणा

Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या