Republic Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे जयपुरात जंगी स्वागत, असा असणार दौरा

| Published : Jan 25 2024, 10:29 AM IST / Updated: Jan 25 2024, 12:52 PM IST

Emmanuel Macron Selfie with Narendra Modi
Republic Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे जयपुरात जंगी स्वागत, असा असणार दौरा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थिती लावणार आहेत. इमॅन्युएल मॅक्रोन आज (25 जानेवारी) भारत दौऱ्यावर येणार असून जयपुरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे जंगी स्वागत करणार आहेत.

Republic Day 2024 : यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (France PM Emmanuel Macron) उपस्थिती लावणार आहे. इॅमॅन्युएल मॅक्रॉन भारतात दोन दिवस दौऱ्यावर येणार आहेत. मॅक्रॉन यांच्या दौऱ्याची सुरुवात जयपुर (Jaipur) पासून होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत करत रोड शो करणार आहे. यानंतर जयुरमधील आमेर किल्ला (Amer Fort) आणि दिल्लीतील जंतर मंतर (Jantar Mantar) येथे दोघे भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे जयपुरातील वेळापत्रक
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सहा तास जयपुरात असणार आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत इमॅन्युएल मॅक्रॉन रोड शो होणार आहे. रोड शो नंतर जयपुरातील रामबाग पॅलेस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जाणार आहेत. येथे भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंधांबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा होऊ शकते. याव्यतिरिक्त युपीआय पेमेंट (UPI Payment) संदर्भात देखील दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होण्याचीही शक्यता आहे.

गेल्या वर्षी दिल्लीत आले होते मॅक्रॉन
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन गेल्या वर्षात (2023) भारताने आयोजित केलेल्या जी20 शिखर परिषदेत (G20 Summit 2023) सहभागी होण्यासाठी दिल्लीला आले होते. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यामध्ये संवादही झाला होता.

वर्ष 2023 मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह यांनी लावली होती हजेरी
वर्ष 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी (Abdel Fattah al-Sisi) यांनी हजेरी लावली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताकडून प्रत्येक वर्षी परदेशातील नेतेमंडळींना मुख्य पाहुण्यांच्या रूपात आमंत्रित केले जाते. वर्ष 2021 आणि 2022 मध्ये कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.

आणखी वाचा : 

Lok Sabha Elections : इंडिया आघाडीला दुसरा झटका, ममता बॅनर्जींनंतर AAP पक्षाची पंजाबमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा

BRICS : भारत-रशिया लवकरच डिजिटल अर्थव्यवस्था तयार करणार, असा पूर्ण होणार अजेंडा

Bharat Ratna to Karpoori Thakur : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, मोदी सरकारची मोठी घोषणा

Read more Articles on