सार

आगामी लोकसभा निवडणूक 2024 आधी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला दुसरा मोठा झटका बसला आहे. याआधी ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमधून एकट्याने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता आम आदमी पक्षानेही इंडिया आघाडीला झटका दिला आहे.

Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणूक 2024 आधी बुधवारी (24 जानेवारी) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला (INDIA Opposition Alliance) दोन मोठे धक्के बसले आहेत. पहिला धक्का म्हणजे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) काँग्रेससोबत मिळून युती करणार नसल्याची घोषणा केली आहे. 

दुसरा धक्का, पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनीही पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्ष (Aam Admi Party) आणि काँग्रेस (Congress) यांच्यामध्ये युती नसल्याचे जाहीर केले आहे.

भगवंत मान यांनी पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागा आम आदमी पक्षच जिंकणार असा दावा केला आहे. खरंतर, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीतील मित्र पक्ष आहेत.

पंजाबमधील 13 जागा आम आदमी पक्षाच जिंकणार- भगवंत मान 
ममता बॅनर्जींनी एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आम आदमी पक्षाने देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत तसाच निर्णय घेतला. याबद्दल भगवंत मान यांनी म्हटले की, "आम्ही पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती करणार नाही. काँग्रेससोबत आमचा काहीही संबंध नाही. आमचा पक्ष राज्यातील लोकसभेच्या 13 जागा जिंकेल."

दिल्ली आणि पंजाबमध्ये जागा वाटपावरुन आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये बातचीत झाली होती. पण दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरुन एकमत झाले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सार्वत्रिक निवडणूका एकट्याने लढण्याच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.

ममता बॅनर्जींचा पक्ष एकट्याने लढवणार निवडणूक
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला झटका देत ममता बॅनर्जींनी त्यांचा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक राज्यात एकट्याने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. ममता बॅनर्जींनी काँग्रेस आणि टीएमसीदरम्यान जागा वाटपावरुन सुरू असलेल्या संघर्षामुळे म्हटले की, मी काँग्रेसला जागा वाटपासंदर्भात एक प्रस्ताव दिला होता. पण सुरुवातीपासूनच काँग्रेसने यासाठी नकार दिला. अशातच तृणमूल काँग्रेस पक्षाने बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : 

Mamta Banerjee Meets With Accident : ममता बॅनर्जींच्या कारला अपघात, डोक्याला दुखापत झाल्याची माहिती

BRICS : भारत-रशिया लवकरच डिजिटल अर्थव्यवस्था तयार करणार, असा पूर्ण होणार अजेंडा

Budget 2024 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष, कृषी क्षेत्रासाठी या घोषणेची शक्यता