Bharat Ratna to Karpoori Thakur : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, मोदी सरकारची मोठी घोषणा

| Published : Jan 24 2024, 10:43 AM IST / Updated: Jan 24 2024, 10:55 AM IST

Karpoori Thakur
Bharat Ratna to Karpoori Thakur : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, मोदी सरकारची मोठी घोषणा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या 100व्या जयंतीआधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

Bharat Ratna to Karpoori Thakur  : ‘जननायक’ आणि ‘दलित-वंचितांचे देव’ मानल्या जाणाऱ्या बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला जाणार आहे. याबद्दलची घोषणा मोदी सरकराकडून करण्यात आली आहे. दीर्घकाळापासून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे अशी मागणी जनता दल युनाइटेड (Janata Dal-United) यांच्याकडून करण्यात येत होती. आता कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या घोषणेनंतर जेडीयूने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.

कर्पूरी ठाकूर यांची जन्मशताब्दी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कर्पूरी ठाकूर यांच्यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर शेअर केली आहे. पंतप्रधानांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “देशात कर्पूरी ठाकूर यांची जन्मशताब्दी साजरी केली जात आहे. आपल्या आयुष्यावर काहीजणांचा व्यक्तिगत प्रभाव राहातो. आपण ज्यांना भेटतो, त्यांचा व्यक्तिगत प्रभाव आपल्यावर पडतो. मला कर्पूरी ठाकूर यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. पण कर्पूरी ठाकूर यांच्यासोबत काम करणारे कैलाशपति मिश्र यांनी त्यांच्याबद्दल मला खूप काही सांगितले आहे. सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी कर्पूरी ठाकूर यांनी ज्या प्रकारे प्रयत्न केले, त्यामुळे कोट्यावधी जणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले. कर्पूरी ठाकूर यांनी काही आव्हानांचा सामना करत समाजासाठी नेहमी काम केले. ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या न्यायासाठी लढत राहिले.”

कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर
समाजवादी नेते आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. कर्पूरी ठाकूर बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री असून भाररत्न पुरस्कार प्राप्त करणारे 49वे मुख्यमंत्री आहेत. दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळणारे ते 17वे नागरिक आहेत.

आणखी वाचा : 

Ram Mandir Pran Pratishtha : 'देव ते देश आणि राम ते राष्ट्रापर्यंत भक्ती असावी', पाहा नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Budget 2024 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष, कृषी क्षेत्रासाठी या घोषणेची शक्यता

57 वर्षांपूर्वी राम मंदिराबद्दल करण्यात आली होती भविष्यवाणी, सोशल मीडियावर पोस्टाचे तिकीट व्हायरल