सार
भारतीय रिझर्व्ह बँकेकडूनरेपो दरामध्ये सहाव्यांदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे देशात रेपो दर 6.50 टक्केच राहणार आहेत.
RBI Monetary Policy : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी पतधोरणाच्या बैठकीनंतर रेपो दरासंदर्भातील (Repo Rate) घोषणा केली. शक्तिकांत दास यांनी म्हटले की, यावेळी देखील रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून तो 6.50 टक्क्यांवर कायम राहणार आहे.
सहाव्यांदा रेपो रेटमध्ये आरबीआयकडून बदल नाही
आरबीआयने पतधोरणाच्या बैठकीत रेपो दर 6.5 टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर सहाव्यांदा आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयची पतधोरणाची बैठक प्रत्येक दोन महिन्यातून एकदा होते. याआधी डिसेंबर (2023) महिन्यात झालेल्या पतधोरणाच्या बैठकीत देखील रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता.
महागाईत घट झाली- शक्तीकांत दास
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास दास यांनी म्हटले की, सरकार आणि केंद्रीय बँकांच्या प्रयत्नांमुळे महागाई दरात घट झाली आहे. आरबीआयने सुरू असलेल्या आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दर 5.4 टक्के, वर्ष 2024-25 साठी 4.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये वास्तविक जीडीपी वाढ 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
एफडी आणि बँक कर्जावर काय होणार परिणाम?
रेपो दर 6.50 टक्केच ठेवण्यात आल्याने बँकांकडून दिले जाणारे कर्ज आणि बचत योजनेवर मिळणारे व्याज यामध्ये कोणाताही बदल झालेला दिसून येणार नाही.
आणखी वाचा :
पेपर फुटीला आता बसणार चाप, लोकसभेत पारित झालेल्या विधेयकाबद्दल जाणून घ्या सविस्तर