सार
सोशल मीडियावर भाजपने नरेंद्र मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाला ‘मोदी की गॅरंटी’ असे म्हणत सपने नहीं हकीकत बुनते हैं’ ही प्रचारमोहीम सुरू केली आहे.
Sapne Nahi Haqeeqat bunte hai Campaign of BJP: 2024 ची लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने मोठ्या दणक्यात निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर भाजपने नरेंद्र मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाला ‘मोदी की गॅरंटी’ असे म्हणत सपने नहीं हकीकत बुनते हैं’ ही प्रचारमोहीम सुरू केली आहे. तब्बल आठ भाषांमध्ये प्रचाराचा व्हिडिओ लॉन्च झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री आणि इतरांनी देखील हे व्हिडीओज शेअर केले आहेत.
पंतप्रधान मुद्रा योजनेवर आधारित शॉर्ट फिल्म लाँच
भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून पंतप्रधान मुद्रा योजनेवर आधारित असलेली शॉर्ट फिल्म एकूण आठ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, आसामी, ओरिया, बंगाली आणि हिंदीमध्ये या भाषांमध्ये या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण झाले आहे. हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत X हँडलवरूनही शेअर करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या योजनांची माहिती देणारे पाच व्हिडीओज झाले लाँच
भारत सरकारने लागू केलेल्या महत्त्वाच्या धोरणांवर आधारित आठ भाषांमध्ये अशा एकूण पाच शॉर्ट फिल्म्स प्रदर्शित प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या फिल्म्स मुद्रा योजना, जन धन योजना, उज्ज्वला योजना, UPI आणि पंतप्रधान आवास योजना या योजनांवर आधारित आहेत.
लक्ष वेधून घेणारी पंचलाईन
'सपने नहीं हकीकत बुनते, तभी तो सब मोदी को चुनते हैं'...अशी या फिल्म्सची पंचलाईन आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप यांचा वापर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने आणि आकांक्षा स्वप्नातून सत्यात साकारल्याचासंदेश या व्हिडिओ फिल्म्सच्या माध्यमातून लोकांना दिला जात आहे.
पंतप्रधान मोदींनी आजी व माजी पिढीला आणि भावी पिढीला दिलेल्या आश्वासनांच्या आणि स्वप्नांच्या पूर्ततेची गॅरंटी असा या अभियानाचा मुख्य संदेश आहे. भाजपने गेल्या आठवड्यात प्रचार गीताच्या लॉन्चिंगच्या वेळी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी अनेक वर्षांची, दशकांची आणि अगदी 500 वर्षांची स्वप्ने पूर्ण केली आहेत.
तभी तो सब मोदी को चुनते हैं... ट्रेंडिंग हॅशटॅग
हे व्हिडीओ लाँच झाल्यावर #TabhiTohSabModiKoChunteHain या हॅशटॅगसह सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. हे व्हिडिओ संसदीय मतदारसंघापासून ते विधानसभा स्तरापर्यंत सोशल मीडिया सेलद्वारे शेअर आणि ट्रेंड केले जात आहेत. पंतप्रधान मोदींपासून ते सर्व केंद्रीय मंत्री आणि प्रमुख नेते हे व्हिडिओ शेअर करत आहेत. हा ट्रेंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक ॲप नरेंद्र मोदी ॲप (नमो ॲप) वर देखील सक्रिय आहे. अनेक फॉलोअर्सने देखील हे रीट्विट केले आहे.
आणखी वाचा -
MP Harda Factory Blast : फटाक्यांच्या कारखान्यात अग्नितांडव! 12 हून अधिक लोकांचा मृत्यू, 200 जखमी