सार

संदीपने 'आयुष्यातील दुर्मिळ दृश्य' असे म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

'रणथंभोरची राणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी-१२४ वाघीण रिद्धी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. रणथंभोर वन्यजीव अभयारण्यातील एका तलावातून तिच्या पिल्लांसह पोहत जातानाचा हा व्हिडिओ आहे. वाघांच्या जगात, रिद्धी ही महान वाघीण मछलीची पाचवी पिढी आहे. रणथंभोर वन्यजीव अभयारण्यातील आणि वन्यजीव प्रेमींसाठी रिद्धी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

अहमदाबाद येथील छायाचित्रकार संदीप इंजिनिअर यांनी रणथंभोर राष्ट्रीय उद्यानातील एक अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचा आनंद व्यक्त केला आहे. रिद्धी आणि तिच्या पिल्लांना तलावातून पोहत जातानाचा हा अविस्मरणीय क्षण त्यांनी टिपला आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत दोन दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

View post on Instagram
 

व्हिडिओमध्ये, रिद्धी आणि तिची पिल्ले रणथंभोर राष्ट्रीय उद्यानाच्या झोन ३ मधील राजबाग तलावातून एका बेटावर जाताना दिसत आहेत. १३ जानेवारी रोजी संदीप इतर पर्यटकांसह संध्याकाळच्या सफारीवर असताना हा अविस्मरणीय क्षण पाहिला आणि कॅमेऱ्यात कैद केला. संदीपने 'आयुष्यातील दुर्मिळ दृश्य' असे म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हा अविस्मरणीय क्षण दाखवल्याबद्दल संदीपचे आभार मानले आहेत. रणथंभोर राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे आहे.