सुवर्ण अक्षरात लिहिलेले रामचरितमानस रामललांच्या चरणी अर्पण, जाणून घ्या खासियत

| Published : Apr 11 2024, 04:08 PM IST / Updated: Apr 11 2024, 04:09 PM IST

 Ram Lalla

सार

अयोध्येत रामललांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता सुवर्ण अक्षरात लिहिलेल्या रामचरितमानसचेही दर्शन घेता येणार आहे. खरंतर, सोन्यातील रामचरितमानसची भेट माजी आयएसए अधिकारी आणि त्यांच्या पत्नीने राम मंदिराला दिली आहे.

Ayodhya Ram Lalla : अयोध्येतील राम मंदिरात सुवर्ण अक्षरात लिहिलेल्या रामायणाची स्थापना मंगळवारी (9 एप्रिल) नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करण्यात आली. एका माजी आयएसए अधिकारी (IAS Officer) आणि त्यांच्या पत्नीने श्रीराम जन्मभूमी येथील रामललांच्या मंदिराला सुर्वण अक्षरात लिहिलेले रामचरितमानस (Ramcharitmanas) भेट दिले आहे. ताम्रपत्रावर सोन्याच्या अक्षराने लिहिलेले रामचरितमानस रामललांच्या गर्भगृहात ठेवण्यात आले आहे.

भाविकांना रामचरितमानसचे दर्शन घेता येणार
राम मंदिराला भेट देण्यात आलेल्या सुवर्ण रामचरितमानसचे दर्शन भाविकांना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून घेता आले. मध्य प्रदेशातील कॅडरचे माजी आयएसए अधिकारी सुब्रमण्यम लक्ष्मीनारायण आणि त्यांची पत्नी सरस्वती यांना गेल्या काही दिवसांपासून सुवर्ण अक्षरात लिहिलेले रामचरितमानस राम मंदिराला भेट द्यायचे होते. अखेर दांपत्याने राम मंदिराला रामचरित मानस भेट दिले आहे. दांपत्याने 25 ताम्रपत्र आणि सोन्याच्या अक्षराने लिहलेले रामचरितमानस अत्यंत खास आहे.

चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापना
सुवर्ण अक्षरात लिहिलेल्या रामचरितमानसची स्थापना चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी रामललांच्या गर्भगृहात करण्यात आली. रामचरितमानस मंदिराला भेट देण्यासाठी दांपत्याने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास येथील काहीजणांशी संपर्क साधला होता. पण काहीही झाले नाही. अखेर दांपत्याने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे न्यासचे महामंत्री चंपत राय (Champant Rai) यांना संपर्क केला असता अखेर रामचरित मानस भेट देण्याचा योग जुळून आला.

रामनवमीच्या दिवशी 20 तास दर्शन करण्याची सुविधा
अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरात रामनवमीच्या (Ram Navami) दिवशी 20 तास दर्शनाची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही व्यवस्था 15 एप्रित ते 17 एप्रिल दरम्यान असणार आहे. अयोध्येत 100 ठिकाणी एलईडी स्क्रिनवर रामनवमीचे लाइव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. रामललांना सकाळ, दुपार आणि रात्री राग भोग आणि श्रृगांर भोग केला जातो. यासाठी चार तासांचा कालावधी लागतो. याशिवाय 20 तासांसाठी दर्शनाची व्यवस्था असणार आहे. यावेळी भाविकांना मोबाइल फोन, शूज, चप्पल सामान मंदिराबाहेर ठेवून दर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

भारताचा प्रधानमंत्री कोण बनू शकते? काय असतो महिन्याला पगार

जया किशोरी यांचे किती झाले आहे शिक्षण, ऐकून तुम्ही व्हाल हैराण

Gudi Padwa 2024 : पंतप्रधान मोदींच्या दिल्ली येथील निवासस्थानी उभारणार मराठमोळी गुढी

Read more Articles on