सार

भारतात ज्यावेळी नव्या योजना आणि गुंतवणूकीचा विचार केला जातो त्यावेळी आमच्या सरकारचा एक वेगळा दृष्टीकोन असतो. याशिवाय आमचा दृष्टीकोन एखाद्या विशेष समुदाय किंवा क्षेत्रासंबंधित नागरिकांपर्यंत मर्यादित नसतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi on Minorities Discrimination : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत काही मुद्द्यांवर चर्चा केली आहे. यावेळी अल्पसंख्यांकांसोबत केल्या जाणाऱ्या भेदभावाच्या तक्रारींवरून प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर पंतप्रधानांनी दिले आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, "अल्पसंख्यांकही त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो हे आता मानत नाहीत. सर्व धर्मातील नागरिक ते मुस्लिम असो ख्रिस्ती, बुद्ध, शीख, जैन अथवा पारसी असो, भारतात सर्वजण आनंदाने राहतायत. याशिवाय श्रीमंतही होत आहेत. पण काही नागरिकांच्या काही सामान्य सवयी असतात ज्यामधून त्यांना आपल्या मर्यादेच्या बाहेर येण्याचा त्रास घेत नाही."

मुलाखतीत नरेंद्र मोदींनी नक्की काय म्हटले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेतील मॅगझीन न्यूजवीक (Newsweek) यांच्यासोबत एक मुलाखत झाली. या मुलाखतीत म्हटले की, आमच्या देशात ज्यावेळी योजना आणि गुंतवणूकीचा मुद्दा येतो त्यावेळी सरकार एक वेगळा दृष्टीकोन ठेवतो. हा दृष्टीकोन एका विशेष समुदाय अथवा क्षेत्रापर्यंत मर्यादित राहत नाही. या योजना सर्वांपर्यंत पोहोचवल्या जातात. याशिवाय कोणासोबत भेदभाव होऊ नये त्याचपद्धतीनेही योजना तयार केल्या जातात. घर असो शौचालय अथवा गॅस सिलेंडरबद्दची योजना असो सर्व नागरिकांपर्यंत पोहोचली जात आहे.

राम मंदिराबद्दल काय म्हणाले PM?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराबद्दल असे म्हटले की, श्रीरामाचे नाव आमच्या राष्ट्रीय चेतनेमध्ये नोंदवले गेले आहे. श्रीरामांमुळेच आयुष्यातील मूल्यांची चौकट बसली गेली आहे. त्यांचे नाव आमच्या पवित्र भूमीचे महत्त्व दाखवून देतो. यामुळेच मी केलेल्या 11 दिवसांच्या अनुष्ठावेळी त्या सर्व ठिकाणांना भेट दिली जेथे श्रीरामांचे पदचिन्ह आहे. याशिवाय देशातील कानाकोपऱ्यात गेल्यानंतर कळले की, प्रत्येकामध्ये प्रभू श्रीरामांसाठी मनात श्रद्धा आहे.

रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी 1.4 कोट्यावधी नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे माहिती होते असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. सर्वजण रामललांच्या प्राणप्रतिष्ठेची आवर्जुन वाट पाहत होते. संपूर्ण देशाने तो दिवस दिवाळीसारखा साजरा केला. घरोघरी दिवे लावण्यात आले होते. याकडे मी दैवी आशीर्वादासारखे पाहिल्याचेही मोदींनी न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

आणखी वाचा :

PM नरेंद्र मोदींची भेट घेणार एलॉन मस्क, काय असणार अजेंडा वाचा सविस्तर...

Voter Education : मतदान केंद्रावर न जाता तुम्ही घर बसल्या करू शकता मतदान, कसे ते जाणून घ्या

“तुम्हीच नजरकैदेत ठेवण्याची मागणी केली होती, त्यामुळे हे पैसे भरावे लागतील”, सुरक्षा व्यवस्था दिल्याप्रकरणी एनआयएनं सादर केलं 1.64 कोटींचं बिल