सार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्दे उपस्थित केले जातात. मात्र माजी पंतप्रधान चरण सिंह यांनी इंदिरा गांधींवर स्विस खात्यातून 60 कोटी रुपये काढल्याचा आरोप केला आणि हा मुद्दा स्विझर्लंडच्या संसदेत देखील गाजला काय आहे प्रकरण जाणून घ्या.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप करत प्रचार करत आहे. तसच काहीस माजी पंतप्रधान चरण सिंह यांनी इंदिरा गांधींवर निवडूक काळात आरोप केले होते. ते आरोप असे होते की, निवडणुकीच्या खर्चासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्विस बँकेच्या खात्यातून 60 कोटी रुपये काढले आहेत. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच तापले होते. तसेच हा मुद्दा स्वित्झर्लंडच्या संसदेत देखील उपस्थित करण्यात आला होता .

अमर उजालाच्या 31 डिसेंबर 1979 च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी भुवनेश्वरमध्ये पत्रकारांना सांगितले होते की, इंदिरा गांधी यांनी स्विस बँकेतून 60 कोटी रुपये काढले आहेत .या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारत सरकारने स्वित्झर्लंड सरकारला पत्र देखील लिहिल आहे. तिथल्या बँकेत जमा केलेल्या पैशांचा तपशील देण्याचे आदेश फक्त स्वित्झर्लंडचे न्यायालयच देऊ शकते, असेही ते त्यावेळी म्हणाले होते.

आधी 40 कोटी नंतर समजले 60 कोटी आहेत :

हा गुन्हा स्वित्झर्लंडमध्ये घडला असून इंदिरा या भारतीय नागरिक असल्याने या प्रकरणातील पैशांचा माग काढण्यात अडचणी येणार आहेत. तत्कालीन पंतप्रधानांनी असेही म्हटले होते की, यापूर्वी इंदिरा गांधींनी 40 कोटी रुपये काढून घेतल्याची बातमी आली होती.मात्र नंतर ही रक्कम 60 कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले. इंदिराजींनी निधी काढून घेतल्याचा मुद्दा स्वित्झर्लंडच्या संसदेतही चर्चिला गेला आहे.

काँग्रेस उमेदवारांना त्या काळी 5 लाख रुपये दिल्याचा आरोप :

21 डिसेंबर 1979 रोजी अमर उजालामध्ये या प्रकरणाशी संबंधित एक बातमी प्रसिद्ध झाली होती, त्यानुसार चौधरी चरण सिंह यांनी लखनौमधील हजरत महल पार्कच्या निवडणूक सभेतही हा मुद्दा उपस्थित केला होता. निवडणुकीत इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यासाठी 10 हजार जीप खरेदी करण्यासाठी पैसा कुठून आला, असा प्रश्न चरणसिंग यांनी उपस्थित केला होता. काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला 5 लाख रुपये देण्यात आले आहेत. परदेशातून मोठ्या प्रमाणावर पैसा मुंबईत येत आहे असे देखील त्यावेळी चौधरी यांनी म्हणले होते.

आणखी वाचा :

'भारतात सर्व धर्मातील नागरिक खुश...', अल्पसंख्यांकांसोबत केल्या जाणाऱ्या भेदभावावर PM नरेंद्र मोदींनी दिले हे उत्तर

Voter Education : मतदान केंद्रावर न जाता तुम्ही घर बसल्या करू शकता मतदान, कसे ते जाणून घ्या

Voter Education :मतदार यादीत नाव आहे का? आता पाहू शकता एका क्लिक वर, वाचा सविस्तर