Gudi Padwa 2024 : पंतप्रधान मोदींच्या दिल्ली येथील निवासस्थानी उभारणार मराठमोळी गुढी

| Published : Apr 06 2024, 10:47 AM IST / Updated: Apr 06 2024, 11:10 AM IST

gudi padwa 2022

सार

कल्याण येथील एका महिलेने एक पर्यावरणपूरक गुढी तयार केली असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीतिल घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार आहे. 

कल्याण : कल्याण येथील एका महिलेने एक पर्यावरणपूरक गुढी तयार केली असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार आहे. ही गुढी पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आली असून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी हि गुढी आहे. देशात राम मंदिर तसेच अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी ही गुढी टपालाने पाठववण्यात आल्याची माहिती,गृहिणी मेधा मोहन आघारकर यांनी दिली.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याशिवाय अनेक मान्यवरांना आपण पर्यावरणपूरक गुढ्या पाठविल्या असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. सध्याच्या धकाधकीत, नोकरी, व्यवसायाच्या व्यापात अनेकांना चैत्र पाडव्याच्या दिवशी घराच्या दारासमोर बांबू आणून गुढी उभारणे शक्य होत नाही. त्यामुळे घरगुती गुढी आपण बनवतो ज्यामुळे आपल्या संस्कृती रक्षणाचे कार्य केले जाते अशी भावना देखील यावेळी व्यक्त केली. आपली हिंदू संस्कृतीची हजारो वर्षाची गुढीची परंपरा पुढे चालू राहावी म्हणून मेधा यांनी पंधरा वर्षापूर्वी घर बसल्या कागद आणि कपड्याच्या साहाय्याने पर्यावरणपूरक गुढी बनवायला सुरूवात केली होती. सुरूवातील दोन ते तीन महिलांच्या साहाय्याने गुढी तयार होत होत्या. आता त्याचे रूपांतर जवळपास १५ महिला यासाठी काम करतात . रोजगाराचे एक साधन या निमित्ताने तयार झाले आहे. केवळ व्यापारी उद्देशातून या गुढ्या आपण तयार करत नाहीत तर, आपल्या संस्कृतीची परंपरा पुढे जावी या विचारातून आपण या गुढ्या तयार करत आहोत, असे मेधा यांनी सांगितले.

भक्तांच्या मनातील आनंंद गुढीच्या रुपाने मोदींना भेट :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. अयोध्येत राम मंदिर उभारून भक्तांची मागणी पूर्ण केली. भक्तांच्या मनातील आनंंद गुढीच्या रुपाने त्यांच्यापर्यंत पोहचावा. आपली पर्यावरणपूरक गुढी त्यांनी घरात उभारून आनंदोत्सव साजरा करावा, या उद्देशातून आपण यावेळी पंतप्रधान मोदींना पर्यावरणपूरक गुढी पाठविली आहे, असे आघारकर यांनी सांगितले.

घर बसल्या महिलांना रोजगार निर्मिती :

सुरुवातीला मी एकटीच गुढी बनवण्यास सुरुवात केली. हळूहळू माझ्या तयार केलेल्या पर्यावरण पूरक गुढीना मागणी वाढली. मग ३ महिला काम करायच्या आता माझ्याकडे यामाध्यमातून जवळपास १५ महिला काम करतात. घरात बसून गुढी तयार करत असल्याने घरबसल्या महिलांना रोजगार मिळत आहे. तसेच माझ्या या कामातून अनेकांना प्रेरणा देखील मिळू शकते. तेही हा व्यवसाय घरबसल्या करू शकतात.

आणखी वाचा :

Gudi Padwa 2024 :गुढीपाडव्याला कडूलिंब आणि गुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्यासाठी अंगणात काढा या सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाइन

Gudi Padwa 2024 :गुढी पाडव्याला सेलेब्रिटींसारखा असा करा मराठमोठा लुक, दिसाल सुंदर

Read more Articles on