सार

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. यादरम्यान अयोध्येतील कानाकोपऱ्यात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय पोलिसांना सुरक्षिततेवेळी स्मार्टफोनचा वापर करण्यास बंदी असणार आहे.

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. अशातच उद्घाटन सोहळ्यावेळी कठोर सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. यादरम्यान राम मंदिराच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार, सुरक्षिततेदरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना स्मार्टफोनचा वापर करता येणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावणार आहेत. याशिवाय देश-विदेशातून प्रतिष्ठित व्यक्तींना देखील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमावेळी सात हजारांहून अधिक व्हीव्हीआयपी (VVIP) अयोध्येत येणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

16 जानेवारीपासून सुरू होणार प्राणप्रतिष्ठेची सुरुवात

अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याआधी 16 जानेवारी पासूनच प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची पूर्ण प्रक्रिया पार पाडणार आहेत. अयोध्येत होणाऱ्या या कार्यक्रमाला 'अमृत महोत्सव' (Amrit Mahotsav) नाव देण्यात आले आहे.

अयोध्येत काही ठिकाणी टेंट सिटीही (Tent City) उभारण्यात आली आहे. या टेंट सिटीमध्ये राम मंदिराच्या उद्घाटन सोहळण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टनुसार, सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांची संख्या 10 ते 15 हजारांच्या आसपास असू शकते.

सात हजार व्हीव्हीआयपींना पाठवण्यात आल्या निमंत्रण पत्रिका
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी सात हजार व्हीव्हीआयपींना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय निमंत्रण पत्रिकेवर राम मंदिराचा फोटोही लावण्यात आला आहे.

आणखी वाचा : 

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी VVIPना पाठवली जातेय खास निमंत्रण पत्रिका, जाणून घ्या खासियत

अयोध्येतील राम मंदिरातील खास प्रसाद ही कंपनी तयार करणार

Ayodhya Ram Mandir : नागर शैलीत उभारण्यात आलेल्या राम मंदिराबद्दलच्या या काही खास गोष्टी माहितेयत का?