सार

राम मंदिर पारंपारिक नागर शैलीत उभारण्यात आले आहेत. भाविकांना मंदिरात सिंह दरवाज्यातून प्रवेश करता येणार आहे. याशिवाय मंदिराच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया अधिक....

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरांच्या उद्घाटनाचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामललांच्या बालरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. अशातच श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिराबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत.

राम मंदिर हे पारंपरिक नागर शैलीत (Nagara Style) बांधण्यात आले आहे. भाविकांना सिंह दरवाज्यातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे. मंदिर 161 फूट उंचीचे असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिरामध्ये 329 स्तंभ आणि 44 दरवाजे आहेत. याशिवाय मंदिरातील स्तंभांवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. मंदिरात येणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सेवा उपलब्ध असणार आहे.

मंदिरात असणार पाच मंडप
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, राम मंदिरात पाच मंडप (हॉल) असणार आहेत. या मंडपांना वेगवेगळी नावेही देण्यात आली आहेत. यानुसार मंदिरातील मंडपांना- नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना आणि किर्तन मंडप अशी नावे देण्यात आली आहेत. मंदिराजवळ प्राचीन काळातील एक सीतेची विहीर देखील आहे.

राम मंदिराच्या काही खास गोष्टी

  • राम मंदिर नागर शैलीत बांधण्यात आले आहे.
  • पूर्व ते पश्चिम दिशेपर्यंत मंदिराची लांबी 380 फूट, रूंदी 250 फूट आणि उंची 161 फूट असणार आहे.
  • मंदिराच्या प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असणार आहे. मंदिर तीन मजली असून यामध्ये 392 स्तंभ आणि 44 दरवाजे आहेत.
  • मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात रामललांची बालरूपातील मूर्ती असणार आहे. पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार असणार आहे.
  • मंदिरात नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना आणि किर्तन मंडप असे पाच मंडप असणार आहेत.
  • मंदिरातील स्तंभ आणि भिंतींवर देवी-देवतांची मूर्ती कोरण्यात आली आहे.
  • पूर्व दिशेला मंदिराचा सिंह दरवाजा उभारण्यात आला आहे. येथूनच भाविकांना मंदिरात जाता येणार आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 32 पायऱ्या चढाव्या लागणार आहेत.
  • मंदिराच्या चहूबाजूंना 732 मीटर लांब आणि 14 फूट रूंद भिंत उभारण्यात येणार आहे.
  • अपंग आणि जेष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय असणार आहे.
  • मंदिर परिसरातील चारही कोपऱ्यांमध्ये मंदिरे उभारली जाणार आहेत. ही मंदिरे सूर्य देव, देवी भगवती, गणपती आणि भगवान शंकर यांना समर्पित असणार आहेत. उत्तर दिशेला देवी अन्नपूर्णा आणि दक्षिण दिशेला भगवान हनुमानाचे मंदिर असणार आहे.
  • मंदिराजवळ एक ऐतिहासिक विहीर आहे, जी सीता कुप म्हणून ओळखली जाते.
  • राम मंदिरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी अगस्त्य, निषाद राज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांचे मंदिर असणार आहे.
  • परिसराच्या दक्षिण-पश्चिमेला कुबेर टिळा येथे जटायूच्या स्थापनेसह भगवान शंकराच्या प्राचीन शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
  • मंदिरात कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही.
  • मंदिराचा पाया उभारताना फार काळजी घेण्यात आली आहे. मंदिराचा पाया 14 मीटर असून रोलर-कॉम्पॅक्ट केलेल्या कॉंक्रिटपासून तयार करण्यात आला आहे.
  • जमिनीतील ओलाव्यापासून संरक्षणासाठी ग्रॅनाइटचा वापर करून 21 फूट उंचीचा चौथरा बांधण्यात आला आहे.
  • मंदिराच्या संकुलात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्र, अग्निसुरक्षेसाठी पाणीपुरवठा आणि स्वतंत्र वीज केंद्र आहे.
  • 25 हजार नागरिकांच्या क्षमतेसाठी एक तीर्थक्षेत्र सुविधा केंद्र बांधले जात आहे.
  • परिसरात आंघोळीसाठी वॉशरूम बांधले जाणार आहेत. या सुविधेसाठी एक वेगळा ब्लॉक तयार केला जाईल.
  •  मंदिराची निर्मिती पूर्णपणे भारतातीत पारंपारिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून केला जात आहे. याशिवाय 70 एकर क्षेत्रापैकी 70% क्षेत्र हिरवेगार ठेवून पर्यावरण-जलसंवर्धनावर विशेष भर देऊन हे बांधले जात आहे.

आणखी वाचा: 

Ayodhya Ram Mandir : शरयू नदीच्या काठावर आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी WATCH VIDEO

WATCH VIDEO : प्रभू श्री राम यांची जीवनकथा पाहण्यासाठी भाविकांची शरयू घाटावर गर्दी

Ayodhya Ram Mandir : रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच अयोध्यानगरी झाली ‘राममय’