India

Ayodhya

अयोध्येतील राम मंदिरातील खास प्रसाद ही कंपनी तयार करणार

Image credits: Getty

राम मंदिर

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार आहेत.

Image credits: social media

राम मंदिरातील प्रसाद

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांमध्ये खास प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. मंदिरातील प्रसाद वेलचीपासून तयार केला जाईल.

Image credits: X Twitter

साखर आणि वेलचीचा प्रसाद

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने निर्णय घेतलाय की, प्राणप्रतिष्ठेवेळी भाविकांना वाटप करण्यात येणारा प्रसाद वेलची आणि साखरेपासून तयार केला जाणार आहे.

Image credits: X Twitter

ही कंपनी तयार करणार प्रसाद

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अयोध्येतील राम मंदिरातील प्रसाद राम विलास अ‍ॅण्ड सन्स या कंपनीकडून तयार केला जाणार आहे.

Image credits: X Twitter

दररोज तयार केला जातोय प्रसाद

राम विलास अ‍ॅण्ड सन्सचे मिथिलेश कुमार यांनी म्हटले की, राम मंदिरासाठीचा प्रसाद दररोज तयार केला जात आहे. प्रसाद वेलची-साखर मिक्स करून तयार केला जात आहे.

Image credits: social media

पाच लाख प्रसादाची पाकिटे

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी कंपनीकडून पाच लाख प्रसादांचे पॅकेट्स तयार केले जात आहे. या कामासाठी 22 कर्मचारी काम करत आहेत.

Image credits: social media

वेलचीचाच का प्रसाद?

कंपनीचे बोल चंद्र गुप्ता यांनी मीडियाला सांगितले की, वेलची आरोग्यासाठी फायदेशीर असते. वेलचीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि काही खनिजे असतात, जे औधषाप्रमाणे काम करतात.

Image credits: Getty

भाविकांसाठी भोजन

छत्तीगढ़ येथून राम मंदिरासाठी 100 टन तांदूळ अयोध्येत आणला जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून खाण्यापिण्याचे सामान येत आहे. या सामानातून भाविकांना भोजन दिले जाणार आहे.

Image credits: asianet news