सार

Ayodhya : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देश-परदेशातून पाहुणे उपस्थिती लावणार आहेत. लाखोंच्या संख्येने भाविकही अयोध्येत येण्याची शक्यता आहे.

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या उद्घाटनसोहळ्यानिमित्त अयोध्येत कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात येत आहे. केंद्रीय राखीव दलाव्यतिरिक्त राज्य पोलीस दल प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. पोलिस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले की, अयोध्या (Ayodhya) हे ठिकाण सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील राहिले आहे. सुरक्षाव्यवस्थेसाठी आमच्याकडे पुरेसे पोलीस दल असल्याचेही प्रवीण कुमार यांनी सांगितले.

लवकरच राम मंदिराच्या सुरक्षिततेसाठी नवी सुरक्षाव्यवस्था लागू केली जाणार आहे.तसेच तपासाशिवाय कोणत्याही व्यक्तीला मंदिराच्या आसपास देखील फिरता येणार नसल्याचेही प्रवीण कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास बंदी

भाविकांच्या दृष्टीने कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी तपास यंत्रणा उभारण्यात येणार आहे. सीसीटिव्ही कॅमेरे देखील लावले जाणार आहेत. तसेच परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास बंदी असणार आहे.

आगामी दिवसात नदीच्या काठावरही कठोर सुरक्षाव्यवस्था केली जाणार आहे. रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यावेळी पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात येणार असून त्या ठिकाणीही सीसीटिव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.

22-23 जानेवारीला अवजड वाहनांना नो-एण्ट्री

22 आणि 23 जानेवारीला (2023) शहरात अवजड वाहनांना नो-एण्ट्री (No Entry) असणार आहे. पण हलक्या वाहनांनासाठी वाहतूकीची व्यवस्था केली जाणार असल्याचे प्रवीण कुमार यांनी सांगितले आहे. कार्यक्रमादरम्यान इंटेलिजन्स विंग (Intelligence Wing) सक्रिय राहणार आहे. याशिवाय सुरक्षिततेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीही (Artificial intelligence) मदत घेतली जाणार आहे.

आणखी वाचा: 

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी तमिळनाडू-पाँडिचेरीतील नागरिकांचे अयोध्येत केले जाणार स्वागत

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या सोहळ्यासाठी अयोध्येतील हॉटेलच्या किंमतीत दहापट वाढ

Ram Mandir : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जगभरातून येणाऱ्या भाविकांना Google रामनगरीत पोहोचवण्याचे करणार काम