सार

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. तत्पूर्वी आजपासून (16 जानेवारी) राम मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे.

Ayodhya Ram Mandir Ceremony : अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या रामललांची मूर्ती कर्नाटकातील मूर्तिकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे. ही मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी निवडण्यात आली आहे. आजपासून राम मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या विधींचे वेळापत्रक जाणून घेऊयात सविस्तर....

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधींचे वेळापत्रक

  • मंदिराच्या ट्रस्टकडून 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाणार आहे.
  • 17 जानेवारीला रामललांची मूर्ती अयोध्येत आणण्यात येणार आहे. यावेळी भाविक शरयू नदीचे पाणी मंगल कलशात घेऊन राम मंदिरात पोहोचणार आहेत.
  • 18 जानेवारीला गणेश अंबिका पूजनापासून कार्यक्रमाची औपचारिक पद्धतीने सुरुवात होणार आहे. यानंतर वरुण पूजा, मातृता पूजा, ब्राम्हण वरण आणि वास्तु पूजा केली जाणार आहे.
  • 19 जानेवारीला नवग्रह आणि हवनसाठी पवित्र अग्नी प्रज्वलित केला जाणार आहे.
  • 20 जानेवारीला राम मंदिराची स्वच्छता शरयू नदीच्या पाण्याने केली जाणार आहे. याशिवाय वास्तु शांति आणि अन्नदिवस पूजा केली जाणार आहे.
  • 21 जानेवारीला रामललांना स्नान घातले जाणार असून मूर्तीची वैदिक पद्धतीने स्थापना केली जाणार आहे.
  • 2 जानेवारीला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरु होणार आहे. या सोहळ्यासाठी 150 देशांतील नागरिक उपस्थितीती लावणार आहेत.

15-200 किलोंच्या पाषाणापासून तयार करण्यात आलीय मूर्ती
अयोध्येत पत्रकार परिषदेला संबोधित करताना मंदिराचे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी म्हटले की, मूर्तिकार अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी 15-200 किलोंच्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. रामललांच्या बालरुपातील मूर्तीसह गेल्या 70 वर्षांपासून पूजा करण्यात येणाऱ्या मूर्तीचीही स्थापना मंदिराच्या गाभाऱ्यात केली जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम 22 जानेवारीला पार पडणार आहे. पण 16 जानेवारीपासून धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे.

आणखी वाचा : 

Ayodhya Ram Mandir सोन्यासारखे चमकेल श्री राम मंदिर, नवीन फोटो पाहिले?

गीता प्रेसकडून रामचरितमानस 10 भाषांमध्ये मोफत डाउनलोडची सुविधा, अशी मिळवा पुस्तकाची प्रत

घरबसल्या मिळणार राम मंदिराचा प्रसाद, जाणून घ्या ऑर्डरची प्रक्रिया