सार

लग्नसोहळा म्हटलं की, घरातील मंडळींची गडबड असते. यावेळी खासकरून नववधूने आपल्या लग्नाबद्दल अनेक स्वप्न पाहिलेली असतात. पण हीच नववधू फसवी निघाली तर काय? अशाच प्रकारचे एक प्रकरण राजस्थानमधील समोर आले आहे.

Rajasthan : राजस्थानमधील भरतपूर (Bharatpur) जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील पोलिसांनी लुटारू वधूला अटक केली आहे. खरंतर या वधूने भरतपूरच नव्हे तर देशातील काही राज्यांमधील मुलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक केली आहे. धक्कादायक बाब अशी की, महिला तीन मुलांची आई देखील आहे.

लाखो रूपये खर्च करून घरी आणली वधू
भरतपूर पोलिसांच्या मते, 26 डिसेंबरला संजय सिंह या व्यक्तीचा विवाह लुटारू वधूसोबत झाला. लग्नासाठी वराच्या घरातील मंडळींनी लाखो रूपयांचा खर्च केला. पण 27 डिसेंबरला (2023) आपल्या सासरी जाताना या वधूने पती संजय याच्याकडे 12 हजार रूपयांची मागणी केली.

संजयने पत्नीला पैसे दिले पण त्याला त्यावेळी संशयही आला. अशातच संजयने पत्नीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. नववधूने सासरच्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता तिला पकडण्यात आले. यानंतर संजयने नववधूच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

अनेकांना आतापर्यंत फसवलेयं
पोलिसांनी जेव्हा महिलेची चौकशी केली तेव्हा धक्कादायक कारण समोर आले. महिलेने राजस्थानच नव्हे तर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि अन्य ठिकाणाच्या राज्यातील तरूणांना आपल्या जाळ्यात अडकवल्याचे कळले.

महिलेच्या या गँगमध्ये उत्तर प्रदेशातील चंदौली आणि गाझीपुर परिसरातील तरूणांचा देखील समावेश आहे. गँगमधील सर्वजण मिळून नागरिकांना लग्नाच्या नावाखाली लुटत असल्याचा प्रकार यावेळी उघडकीस आला.

तीन मुलांची आई
पोलिसांना चौकशीत पुढे कळले की, ताब्यात घेण्यात आलेली महिला तीन मुलांची आई देखील आहे. पोलिसांकडून गँगमधील अन्य जणांचा शोध घेतला जात आहे. सध्या संपूर्ण तपासानंतरच कळेल की, अखेर गँगने आतापर्यंत देशातील किती तरूणांना लुटले आहे.

आणखी वाचा: 

काय सांगता! एकच घर पण दरवाजे दोन राज्यांमध्ये उघडतात, नक्की काय आहे भानगड?

नववर्षात विमानतळांवर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, मुंबई-दिल्लीसह या 7 ठिकाणी ALERT

काय सांगता! जेवणात मटण दिले नाही म्हणून नववधूच्या घरून वराच वऱ्हाड घरी परतलं