सार
PM Narendra Modi : नरेंद्र मोदी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यापूर्वीच 27 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांची जात ओबीसी म्हणून घोषित करण्यात आली होती.
PM Modi Caste Issue : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जात ओबीसीमध्ये (OBC) समाविष्ट करण्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जातीवरून निशाणा साधण्यात आल्यानंतर भाजपने त्यांच्या आरोपास जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय अधिसूचनेनुसार नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी 27 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांची जात ओबीसी म्हणून घोषित करण्यात आली होती, अशी माहिती भाजपने दिली आहे.
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' गुरुवारी ओडिशाहून छत्तीसगडमध्ये पोहोचली. यावेळेस जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा जन्म ओबीसी समाजामध्ये झाला नव्हता.
पुढे ते असेही म्हणाले की, "तुम्हा सर्वांना अतिशय वाईटरित्या फसवले गेले आहे. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तेली समाजामध्ये जन्माला आले होते. त्यांच्या समाजाला भाजपने वर्ष 2000 साली ओबीसी श्रेणीमध्ये समाविष्ट केले. तुमचे पंतप्रधान ओबीसी म्हणून जन्माला आले नाहीत, तुमचे पंतप्रधान सामान्य श्रेणीतील जातीमध्ये जन्मले. ते जगभरात खोटे बोलत आहेत की ते ओबीसी म्हणून जन्माला आलो. ते कोणत्याही ओबीसी व्यक्तीची गळाभेट घेत नाहीत. ते कोणत्याही शेतकऱ्याचा हात धरत नाहीत."
राहुल गांधी असेही म्हणाले की,"जेव्हा मी जातीनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायाबाबत भाष्य केले. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशामध्ये श्रीमंत आणि गरीब अशा दोनच जाती आहेत. बरे, जर दोनच जाती असतील तर तुम्ही कोणत्या जातीचे आहात? तुम्ही गरीब नाही, तुम्ही 24 तास नवीन सूट परिधान करता. कोट्यवधी रुपयांचे सूट परिधान करता, मग तुम्ही गरीब कसे? दोनच जाती आहेत तर तुम्ही ओबीसी वर्गामध्ये कसे मोडू शकता?" .
राहुल गांधी यांनी नेमके काय केले आहेत आरोप? पाहा VIDEO
आणखी वाचा
Kilkari Programme : राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी किलकारी योजना, मिळणार हे लाभ
Mumbai Property Tax : मुंबईकरांना मोठा दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही