Leopard Safari Project : जुन्नरमधील बिबट सफारी निर्मितीमुळे निसर्ग पर्यटनाला मिळेल चालना - सुधीर मुनगंटीवार

| Published : Feb 06 2024, 01:03 PM IST / Updated: Feb 06 2024, 01:07 PM IST

Sudhir Mungantiwar

सार

Leopard Safari Project : पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नरमध्ये (Junnar Taluka) आंबेगव्हाण येथे ‘बिबट सफारी’ची निर्मिती करण्यास सोमवारी (5 फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Leopard Safari Project : पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने (State Government) जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) आंबेगव्हाण (Ambegwan) येथे बिबट सफारी (Leopard Safari) सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Sudhir Mungantiwar) यांनी यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेऊन मंत्रिमंडळाच्या मान्यतेने ही सफारी सुरू करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. 

मंत्रिमंडळ निर्णयाने त्यावर शिक्कामोर्तब झाल्याने आता जुन्नर (Junnar), आंबेगाव (Ambegaon), खेड (Khed) व शिरूर ( Shirur) तालुक्यातील वन व निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

कोणत्या तालुक्यातील वन क्षेत्राचा असणार समावेश?

जुन्नर वन विभागामध्ये (Junnar Forest Department) प्रामुख्याने जुन्नर तालुक्यात बिबट वन्यप्राण्यांची (Leopard Wildlife) संख्या मोठया प्रमाणात असल्याने स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी विचारात घेऊन बिबट वन्यप्राण्यासाठी जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी (Leopard Safari) निर्मिती करण्याचा प्रस्ताव मान्य केला. 

जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 58 हजार 585 हेक्टर वनक्षेत्र समाविष्ट असून या वन विभागात पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या चार तालुक्यातील वन क्षेत्राचा समावेश होतो. त्यामध्ये शिरूर वगळता जुन्नर, आंबेगाव, खेड हे तालुके पश्चिम घाटाचे (Western Ghats) वनक्षेत्रात येतात.

यासाठी विस्तृत प्रकल्प आराखड्यास नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून मान्यता घेण्यात येईल. या प्रकल्प अहवाल खर्चासाठी 80 कोटी 43 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली. तसेच जुन्नर (Junnar) हा राज्यातील पहिला पर्यटन तालुका (Tourism Taluka) होणार असल्याने पर्यटन सर्किट (Tourist Circuit) विकसित करणे शक्य होईल, अशीही माहिती समोर आली आहे.

‘जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित’

वन मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, या चार तालुक्यांना निसर्ग व ऐतिहासिक स्थळांचा मोठा वारसा आहे. या चारही तालुक्यात पर्यटनाकरीता मोठ्या संख्येने पर्यटक विविध पर्यटन स्थळांना तसेच गड किल्ल्यांना भेटी देत असतात. जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी, अष्टविनायक गणपतीची (Ashtavinayak Ganpati) लेण्याद्री (Lenyadri), ओझर ही धार्मिक स्थळे आणि माळशेज घाट, नाणेघाट, किल्ले जिवधन, किल्ले चावंड ही प्रामुख्याने पर्यटकांची आवडती स्थळे आहेत. 

रोजगाराच्या संधी

राज्य शासनानेही जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित केलेला आहे. या बिबट सफारीने येथील पर्यटनाला अधिक चालना मिळेल आणि रोजगाराच्या (Employment Opportunities) अधिक संधी उपलब्ध होतील, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

प्रकल्पाबाबत कधी करण्यात आली होती घोषणा?

राज्य शासनाने सन 2023-24च्या अर्थसंकल्पातही जुन्नर तालुक्यात बिबट सफारी सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली होती. बिबट सफारीच्या स्थळ निश्चितीसाठी जुन्नर वन विभागाच्या स्तरावर नेमलेल्या नऊ सदस्यीय समितीने सुचवलेल्या स्थळांपैकी आंबेगव्हाण येथे बिबट सफारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मौजे आंबेगव्हाण (Mauje Ambegwan) येथे दाट वनक्षेत्र असून ते नागरीकरणापासून दूर असल्याने या ठिकाणी बिबट सफारी प्रकल्प (Leopard Safari Project) राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणकोणत्या सुविधा असणार?

बिबट सफारी प्रकल्पासाठी एकूण 54 हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली असून केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन या सफारीमध्ये पर्यटक व बिबट वन्यप्राणी यांच्या सुरक्षिततेसाठी विद्युत स्वयंचलित आणि सेन्सर असलेले दुहेरी प्रवेशद्वार, सफारी रस्ता, रात्रीचे निवारे, संरक्षक भिंत आदी सुविधा असणार आहेत.

आणखी वाचा

Mumbai Property Tax : मुंबईकरांना मोठा दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही

Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा देण्यास मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

Vayoshri Yojana: ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, वयोश्री योजनेतून मिळणार लाभ