सार
Vibrant Gujarat Global Summit 2024 : गुजरातमधील गांधीनगर येथे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटदरम्यान असे काही घडले जे यापूर्वीही कधीही घडले नसेल. नेमके काय घडले? वाचा सविस्तर…
Vibrant Gujarat Global Summit 2024 : संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान भव्य सार्वजनिक मंचांमध्ये सहभागी होत असताना भाष्य न करणे पसंत करतात.
पण भारतावरील प्रेम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असलेल्या आदराप्रति त्यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या मंचावर भाषण केले. याद्वारे त्यांच्या मनात भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत किती आदर आहे, हे दिसले.
अमिरातीतील लॉजिस्टिक कंपनीचे सीईओ काय म्हणाले?
अमिराती मल्टीनॅशनल लॉजिस्टिक कंपनी डीपी वर्ल्डचे ग्रुप चेअरमन आणि सीईओ सुलतान अहमद बिन सुलेयम यांनीही व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमधील उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, "DP वर्ल्ड पुढील तीन वर्षात 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.
राज्यात उत्पादन निर्माण करून गुजरातच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ देत राहू. भविष्याचा विचार करता आम्ही भारत आणि UAE देशांदरम्यान सखोल व्यापार, रोजगार आणि सांस्कृतिक सहकार्याची अपेक्षा करतो. भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी सरकारसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे".
सिमटेक कंपनीचे ग्लोबल CEO काय म्हणाले?
दक्षिण कोरियन (South Korean) कंपनी सिमटेकचे ग्लोबल सीईओ जेफरी चुन म्हणाले की, गुजरातमध्ये (Gujarat) मायक्रोन गुंतवणुकीच्या योजनेनंतर आता आम्ही भारतामध्ये गुंतवणुकीची तयारी करत आहोत. केंद्र व राज्य शासनाकडून सहकार्य मिळत आहे. आम्ही भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यास आणि गुजरातमध्ये हजारो रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास तयार आहोत.
आणखी वाचा
VIRAL VIDEO : राजीव गांधींबद्दल हे काय म्हणाले सॅम पित्रोदा? नेटकरी करताहेत ट्रोल
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिरात बसवले जाणार सुवर्णद्वार, पाहा PHOTO