सार
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशात सुरु झाली आहे. माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कोण उमेदवार राहील, हे अजूनही ठरलेलं आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशात सुरु झाली आहे. माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कोण उमेदवार राहील, हे अजूनही ठरलेलं आहे. एका बड्या नेत्यान माढा लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे तिकीट मागितलं आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी तिकीट मागितले आहे.
कोण आहे तो बडा नेता? -
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिल्लीमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. मोहिते पाटील हे तिकीट घ्यायला तयार नसतील तर मी उभे राहतो, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे. यावेळी प्रवीण गायकवाड यांना तयारी करा, अशा सूचना दिल्या आहेत. माढ्यातील जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे.
शरद पवारांचा शिंदे यांना धक्का -
माढा लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश केला जाणार आहे. भाजपचे काम करणार नाही असे कोकाटे यांनी म्हणून शरद पवार गटात प्रवेश केला जाणार आहे. माढा तालुक्यातील बबनराव शिंदे यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. पण प्रवीण गायकवाड इच्छुक असल्याचे दिसून आले आहे.
आणखी वाचा -
अबकारी धोरण प्रकरण : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
Video : गुवाहाटी विमानतळाच्या छताचा पावसामुळे एक भाग कोसळला, प्रवाशांमध्ये उडाली खळबळ