PPF मध्ये पैसे जमा करण्यासाठी आजची तारीख ठेवा लक्षात, होईल फायदा

| Published : Apr 05 2024, 12:09 PM IST / Updated: Apr 05 2024, 12:18 PM IST

money

सार

तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण पीपीएफच्या योजनेत तुमचा फार मोठा फायदा होऊ शकतो. 

PPF Scheme Benefits : बहुतांशजण गुंतवणूकीसाठी शासकीय योजनांची निवड करतात. यापैकीच एक म्हणजे पीपीएफ गुंतवणूक. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याची 5 तारीख फार महत्त्वाची असते. अशातच तुम्ही एखाद्या महिन्याच्या 5 तारखेला पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला संपूर्ण महिन्याभराचे व्याज दिले जाते. अन्यथा व्याज मिळत नाही.

सुरक्षित गुंतवणूक आहे पीपीएफ
पीपीएफमध्ये बहुतांश नोकरदार वर्गातील व्यक्ती टॅक्स बचतीसाठी गुंतवणूक करतात. पण थोडा विचार करून पैसे गुंतवल्यास उत्तम रिटर्न मिळू शकतात. सर्वप्रथम पीपीएफमध्ये महिन्यानुसार गुंतवणूक करावी. याशिवाय प्रत्येक महिन्याची 5 तारीखही फार महत्त्वाची आहे हे देखील लक्षात ठेवा. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायीच असल्यास पीपीएफ बेस्ट पर्याय आहे. पीपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यास कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांचे टॅक्स डिडक्शन मिळते.

गुंतवणूकीसाठी 5 तारीख आहे खास
तुम्ही पीपीएफमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला गुंतवणूक केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते. खासकरून प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. यामागील कारण म्हणजे, पीपीएफ खात्यामधील व्याजाचे कॅल्युलेशन प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेनुसार केले जाते.

याशिवाय प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेनंतर गुंतवणूक केल्यास संपूर्ण महिन्याभराचे व्याज मिळत नाही. केवळ 5 ते 30 तारखेदरम्यानच्या कमी बचतीवरच व्याज मिळते.

पीपीएफमध्ये 7 टक्क्यांहून अधिक मिळते व्याज
टॅक्समध्ये बचत आणि सुरक्षित गुंतवणूक करायची असल्यास सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये पीपीएफला सर्वाधिक लोकप्रिय आहे. यामध्ये सरकार जमा रक्कमेवर 7.1 टक्के दराने व्याज देते.

आणखी वाचा : 

Gold Prize : गुढी पाडव्याआधीच सोने जाणार ७२ हजारांवर !

FASTag:आता एका वाहनासाठी एकच फास्ट टॅग, देशभरात 'एक वाहन एकच फास्टॅग'

1 एप्रिलपासून LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 32 रुपयांनी घट, जाणून घ्या मुंबई ते दिल्लीतील नवे दर