सार

आज सर्वत्र महिला दिवस साजरा केला जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या किंमतीवर 100 रुपयांची सूट दिली जाणार असल्याचे म्हटले आहे.

PM Narendra Modi Tweet : भारत सरकारने गुरुवारी (7 मार्च) पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) घरगुती गॅसवर 300 रुपये प्रति एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) सब्सिडीला एका वर्षासाठी वाढवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी भारत सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आज (8 मार्च) महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, “महिला दिवसानिमित्त आज आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किंमती 100 रुपयांनी कमी केल्या आहेत. यामुळे नारी शक्तीचे आयुष्य सोपे होण्यासह कोट्यावधी परिवारांवरील आर्थिक बोजा कमी होईल. हे पाऊल पर्यावरणाच्या संरक्षणासाठी फायदेशीर ठरेल, ज्यामुळे संपूर्ण परिवाराचे आरोग्य देखील उत्तम राहिल.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला दिनानिमित्त एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत सूट दिल्याचा निर्णयाचे कौतुक केले जात आहे. या निर्णयाची घोषणा पंतप्रधानांनी अशावेळी केली ज्यावेळी गुरुवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत आर्थिक प्रकरणांत कॅबिनेट समितीने वर्ष 2024-25 पर्यंत 300 रुपयांची सूट देण्यास मंजूरी दिली आहे. 

आणखी वाचा : 

PM Modi in Jammu-Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कलम 370 वरुन राजकीय परिवारवादी पक्षांवर हल्लाबोल, वाचा श्रीनगर येथे दिलेल्या भाषणातील ठळक मुद्दे

UPA VS NDA : आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय विकासाचा आनंद, मोदी सरकारच्या काळात असे बदलले महिलांचे आयुष्य

Sandeshkhali : संदेशखळी येथील पीडित महिलांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट, भेटीनंतर महिला झाल्या भावुक