UPA VS NDA : आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय विकासाचा आनंद, मोदी सरकारच्या काळात असे बदलले महिलांचे आयुष्य

| Published : Mar 07 2024, 01:34 PM IST / Updated: Mar 07 2024, 01:39 PM IST

Women Development

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिलांचे आयुष्य बदलण्यासाठी अनेक विकासकामे केली आहेत. याशिवाय महिलांसाठी काही खास योजना देखील लाँच केल्या आहेत. जाणून घेऊया मोदी सरकारच्या काळात कशा प्रकारे महिलांचे आयुष्य बदललेय याबद्दल सविस्तर....

UPA VS NDA : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार महिलांच्या विकासाच्या दिशेने काम करत आहे. वर्ष 2014 नंतर देशातील अर्ध्या लोकसंख्येसाठी जी कामे केली आहेत त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत. याआधी चुलीमधून निघणाऱ्या धुरामुळे महिलांच्या डोळ्यांना त्रास व्हायचा. पण आता महिलांच्या चेहऱ्यावर विकासाची एक वेगळी चमक दिसून येत आहे. जाणून घेऊया मोदी सरकारने महिलांच्या हितासाठी कोणती कामे केलीत याबद्दल सविस्तर.....

लोकसभा आणि विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व कमी प्रमाणात दिसून येत असल्याचा मुद्दा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. या मुद्द्याकडे लक्ष देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा कायदा पारित केला आहे. यामुळे सत्तेतील महिलांची भागीदारी वाढणार आहे.

भारतातील लिंग गुणोत्तर
भारत याआधी त्या देशांच्या लिस्टमध्ये होता जेथे पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये स्थिती बदलली गेली आहे. आता भारतातील लिंग गुणोत्तर 1020 झाले आहे. याचा अर्थ असा होतो की, प्रति एक हजार पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 1020 आहे. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी मुल जन्माला घातल्यानंतर मिळणारी प्रसूती सुट्टी फार महत्त्वाची असते. ही सुट्टी आता 26 आठवडे करण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत 3.2 कोटी खाती सुरू केली
देशातील 4.73 कोटींहून अधिक गर्भवती महिलांनी पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत आपली तपासणी करून घेतली. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत (Sukanya Samriddhi Scheme) 3.2 कोटी खाती सुरू केली आहेत. याशिवाय पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे महिलांचे आयुष्य फार बदलले गेले आहे. जवळजवळ 10 कोटी परिवारांना एलपीजी गॅस (LPG Gas) सिलेंडर मिळाले आहेत.

महिलांसाठी मोदी सरकारने पंतप्रधान ग्रामीण आवाज योजना (Pradhan Mantri Gramin Awas Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 72 टक्क्यांहून अधिक घर किंवा पूर्णपणे अथवा संयुक्तपणे घर महिलांच्या नावावर आहे. पंतप्रधानांच्या मोदी सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसंबंधित कामे केली आहेत. याचा सकारात्मक परिणाम वर्ष 2014-16 मध्ये दिसून आला. त्यावेळी प्रति एक लाख मुलांचा जन्म झाल्यानंतर 130 महिलांचा मृत्यू व्हायचा. पण वर्ष 2018-20 मध्ये महिलांच्या मृत्यूचा आकडा 97 वर पोहोचला आहे.

तिहेरी तलाकमुळे मुस्लीम महिलांना मोठा दिलासा
नरेंद्र मोदी सरकारने तिहेरी तलाक (Triple Talaq) रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. यामुळे मुस्लीम समाजातील महिला सशक्त झाल्या आहेत. केंद्र सरकारकडून महिलांना व्यवसाय क्षेत्रात फार मोठे प्रोत्साहन वेळोवेळी दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) योजनेअंतर्गत महिला व्यावसायिकांना 69 टक्के कर्ज दिले जाते. याशिवाय स्टॅण्ड-अप इंडिया योजनेचा 84 टक्के महिलांना लाभ झाला आहे. तिन्ही सैन्यात अग्निवीरच्या रुपात महिलांची भरती केली जात आहे.

स्वच्छ भारत मिशन
गावातील गरीब महिलांना याआधी शौचासाठी अंधार होण्याची वाट पाहावी लागायची. हा मुद्दा पंतप्रधानांनी लक्षात घेत 2 ऑक्टोंबर 2014 रोजी स्वच्छ भारत मोहिमेची (Swachh Bharat Mission) सुरूवात केली. यामुळे महिलांना फार मोठा फायदा झाला.

14.45 कोट्यावधी घरांपर्यंत पोहोचवले गेले शुद्ध पाणी
देशातील प्रत्येक घरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मोदी सरकारने 15 ऑगस्ट 2019 रोजी जल जीवन मोहिमेची सुरूवात केली. या मोहिमेअंतर्गत 14.45 कोटी घरांतील नळांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा केला गेला. याशिवाय आता महिलांना शुद्ध पाण्यासाठी दूरवर जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत नाही.

UPA VS NDA : महिलांचे आयुष्य असे बदलले

  • याआधी महिलांना शुद्ध पाण्यासाठी सर्वत्र भटकत राहावे लागायचे. पण मोदी सरकारच्या काळात 14.45 कोटी नागरिकांच्या घरात शुद्ध पाणी पोहोचले आहे.
  • याआधी चुलीवर महिलांना जेवण तयार करावे लागायचे. पण आता उज्ज्वला योजनेअंतर्गत 10 कोटींहून अधिक एलपीजी सिलेंडरचे कनेक्शन देण्यात आले आहे.
  • याआधी महिलांना शौचासाठी अंधार होण्याची वाट पाहावी लागायची. पण आता स्वच्छ भारत योजनेअंतर्गत 12 कोटी शौचालये उभारण्यात आली आहेत.
  • याआधी वीजेअभावी रॉकेल जाळावे लागायचे. पण आता 2.86 कोटी परिवारांच्या घरात वीज पोहोचवण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

पुढील पाच वर्षांमध्ये भारत जगाच्या विकासाचे कारण ठरेल, IMF चे भाकीत

Sandeshkhali : संदेशखळी येथील पीडित महिलांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट, भेटीनंतर महिला झाल्या भावुक

लोकसभा निवडणुकीआधी PM मोदींच्या अप्रुवल रेटिंगमुळे विरोधी पक्षात खळबळ, जाणून घ्या आकडेवारी