PM Modi in Jammu-Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कलम 370 वरुन राजकीय परिवारवादी पक्षांवर हल्लाबोल, वाचा श्रीनगर येथे दिलेल्या भाषणातील ठळक मुद्दे

| Published : Mar 07 2024, 04:50 PM IST / Updated: Mar 08 2024, 11:44 AM IST

PM Modi
PM Modi in Jammu-Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कलम 370 वरुन राजकीय परिवारवादी पक्षांवर हल्लाबोल, वाचा श्रीनगर येथे दिलेल्या भाषणातील ठळक मुद्दे
Share this Article
 • FB
 • TW
 • Linkdin
 • Email

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये सभेला संबोधित करत विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी पंतप्रधानांनी कलम 370 चा फायदा काश्मीरमधील काही परिवारवादी पक्षांनी घेतल्याचे म्हटले.

PM Modi in Jammu-Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी (7 मार्च) श्रीनगर (Srinagar) येथील काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या दरम्यान पंतप्रधानांनी कलम 370 हटविल्यानंतरच्या मुद्द्यावरही भाष्य केले. पंतप्रधानांनी म्हटले की, कलम 370 चा फायदा जम्मू-काश्मीरमधील काही राजकीय परिवारवादी पक्षांनी घेतला आहे. आज नागरिकांना कळतेय त्यांची दिशाभुल केली जात आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर आज विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे.

वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

 • “हे नवे जम्मू-काश्मीर आहे ज्याची आपण सर्वजण काही दशकांपासून वाट पाहत होतो. यासाठी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले होते.”
 • तुमच्या प्रेमामुळे जेवढा आनंदी आहे तेवढाच कृतज्ञ देखील असल्याचे पंतप्रधानांनी श्रीनगर .येथील सभेत म्हटले. वर्ष 2014 नंतर जेव्हा जेव्हा मी येथे आलो तेव्हा म्हटले की, ही मेहनत तुमची मनं जिकण्यासाठी करत आहे. मला दिसतेय तुमचे प्रेम मला मिळतेय. हा प्रयत्न असाच सुरू राहिल.
 • काही काळाआधी जम्मूला आल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. येथे 32 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला होता. आज श्रीनगर येथे काही विकास प्रकल्पांची सुरूवात करत आहे
 • “जम्मू-काश्मीर भारताचे मस्तक आहे. उंच झालेले मस्तकच विकास आणि सन्मानाचे प्रतीक असते.”
 • एक काळ असा होता जेव्हा देशात जे कायदे होते ते जम्मू-काश्मीरमध्ये लागू केले जात नव्हते. गरीब कल्याण योजना संपूर्ण देशात लागू होती. पण जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना त्याचा लाभ मिळत नव्हता. पण आता काळ बदलला आहे. आज जम्मू-काश्मीरमधूनच संपूर्ण देशासाठी प्रकल्पांचे लाँचिंग केले आहे.
 • जेव्हा तुमचा हेतू चांगला असतो त्यावेळी त्याचे परिणामही उत्तम होतात. जगाने पाहिलेय की, कशाप्रकारे जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 चे आयोजन करण्यात आले होते. आज जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाचे रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत. वर्ष 2023 मध्ये दोन कोटींहून अधिक पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली. परदेशातील पर्यटकांची संख्याही अडीच पटींनी वाढली आहे.
 • जम्मू-काश्मीर आज वेगाने विकासाच्या पथावर आहे. येथील नागरिकांना दोन एम्सची सुविधा मिळणार आहे. सात नवे वैद्यकिय महाविद्यालये, दोन नवे कॅन्सर रुग्णालय स्थापन करण्यात आले आहेत. आयआयटी आणि आयआयएम सारख्या शिक्षण संस्था उभारण्यात आल्या आहेत.
 • येणाऱ्या काळात जम्मू-काश्मीरच्या यशाची कथा संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र होईल. येथील झऱ्यांच्या ठिकाणी कमळ फुललेले दिसते. स्टेडिअममध्ये देखील कमळाची निशाणी आहे. भाजपचे चिन्ह देखील कमळ आहे. याशिवाय कमळाचे जम्मू-काश्मीरसोबतचे नाते सखोल आहे.
 • आज जम्मू-काश्मीर विकासाच्या नव्या उंच गाठत आहे. येथील नागरिकांची काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कलम 370 च्या नावाखाली दिशाभुल केली आहे. कलम 370 चा फायदा जम्मू-काश्मीरला होता की काही राजकीय परिवारांनी त्याचा लाभ घेतला? आता जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना सत्य कळले आहे की, त्यांची दिशाभुल केली जात आहे.
 • परिवारवादी पक्षांनी जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना काही दशके त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले. आज प्रत्येक वर्गाला त्यांचे अधिकार मिळाले आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये जेएनके बँक ही घराणेशाही आणि भ्रष्टाचाराची मोठी शिकार झाली आहे. ती नष्ट करण्यासाठी आधीच्या सरकारने कोणतीच कसर सोडली नाही. आपल्याच नातेवाईकांना बँकेत लावत परिवारवाद्यांनी त्यांचे कंबरडे मोडले होते. बँकेला एवढे नुकसान झाले की, तुमचे हजारो कोटी रुपये बुडण्याचा धोका होता. आमच्या सरकारने जेएनके बँकेला वाचवले.
 • ज्यावेळी इमानदार सरकार असते तेव्हा जनतेला प्रत्येक समस्येतून बाहेर काढले जाऊ शकते. स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीर हे घराणेशाहीच्या राजकारणाचा सर्वात जास्त बळी ठरले आहे. आज घराणेशाहीतील बहुतांशजण देशाचा विकास, जम्मू-काश्मीरच्या विकासामुळे त्रस्त होत माझ्यावर हल्लाबोल करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभेत म्हटले.
 • “पंतप्रधानांनी भाषणामध्ये जम्मू-काश्मीरचा विकास आता थांबणार नसल्याचा विश्वास नागरिकांना दिला. पुढील पाच वर्षांमध्ये जम्मू-काश्मीर अधिक वेगाने विकास करेल. काही दिवसात रमजान सुरू होणार आहे. मी जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना आताच या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा देतो.”

आणखी वाचा : 

Jammu-Kashmir : भरसभेत मधमाशी पालन करणाऱ्या तरुणाकडून सेल्फीची मागणी, PM मोदींनी असे केले स्वप्न पूर्ण

UPA VS NDA : आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय विकासाचा आनंद, मोदी सरकारच्या काळात असे बदलले महिलांचे आयुष्य

Sandeshkhali : संदेशखळी येथील पीडित महिलांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट, भेटीनंतर महिला झाल्या भावुक